सांगली : संतोष शिंत्रेंच्या कथासंग्रहास म. द. हातकणंगलेकर पुरस्कार, उद्या गुरुवारी प्रदान सोहळा, तिसऱ्या स्मृतीदिनी सांगलीत कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 05:41 PM2018-01-24T17:41:14+5:302018-01-24T17:54:48+5:30
दिवंगत ज्येष्ठ समीक्षक व लेखक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार यंदा पर्यावरणवादी लेखक संतोष शिंत्रे यांच्या गुलाबी सीर अर्थात पिंक हेडेड डक या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. उद्या गुरुवारी २५ जानेवारी रोजी तो त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सांगली : दिवंगत ज्येष्ठ समीक्षक व लेखक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार यंदा पर्यावरणवादी लेखक संतोष शिंत्रे यांच्या गुलाबी सीर अर्थात पिंक हेडेड डक या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. उद्या गुरुवारी २५ जानेवारी रोजी तो त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
जुना बुधगाव रस्त्यावरील नवजीवन विकास संस्थेच्या सभागृहात दुपारी ४ वाजता हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार असून लेखक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ प्रमुख वक्ते म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कारप्राप्त शिंत्रे हे विज्ञानाचे अभ्यासक असून पर्यावरणवादी लेखक म्हणून परिचित आहेत. अनुभवावर आधारीत कथा, व्यक्तींच्या तऱ्हा यावर आधारीत माध्यमावरील त्यांची पकड चांगली आहे. त्यांना दोनवेळेला राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघातर्फेही त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांची आतापर्यंत पाच पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. हातकणंगलेकर यांच्या स्मृतीदिनाच्या या कार्यक्रमास सांगलीतील नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपसिथत रहावे, असे आवाहन नवजीवन विकास संस्थेतर्फे करण्यात आले आहे.