सांगली : समाजाचे प्रश्न सुटेपर्यंत लढा -मराठा समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष : सुरेशदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 08:05 PM2018-09-24T20:05:31+5:302018-09-24T20:06:26+5:30
समाजाच्या कोणत्याही प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नसल्याचे दिसून आल्याने आम्ही मराठा समाज म्हणून स्वतंत्र पक्ष काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पक्षाचे संयोजक सुरेशदादा पाटील यांनी
सांगली : समाजाच्या कोणत्याही प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नसल्याचे दिसून आल्याने आम्ही मराठा समाज म्हणून स्वतंत्र पक्ष काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पक्षाचे संयोजक सुरेशदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, हा पक्ष मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी कटिबद्ध असून, मराठा समाजाचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या शेती व्यवसायाशी निगडीत असणारे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविणार आहे. मराठा समाजाचा शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे, मराठा तरुणांना स्वयंरोजगार व उद्योगाकडे वळविणे यासाठी सक्षम कार्यक्रम तयार करणार आहे. आगामी काळात इतर अनेक सामाजिक व्यक्तींशीसुद्धा याबाबत चर्चा केली जाईल. सध्या पक्षाचा संघटन बांधणीवर अधिक भर आहे. महाराष्टÑातील जास्तीत-जास्त मराठा तरुणांनी या पक्षात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आम्ही केले आहे.
राज्यात आगामी निवडणुकांमध्ये आमचा पक्ष मोठ्या प्रमाणात मुसंडी मारणार, याची खात्री वाटते. सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी मल्हार क्रांती मोर्चा, लिंगायत क्रांती मोर्चा, मुस्लिम क्रांती मोर्चा, किसान क्रांती जनआंदोलन व शेतकऱ्यांची सुकाणू समिती यामधील चळवळीत काम करणाºया नेत्यांशी व भाजप, शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादी या चार मोठ्या पक्षांबरोबर न जाऊ इच्छिणाºया १० छोट्या पक्षांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. सध्या ही नावे आम्ही गोपनीय ठेवली आहेत. येणाºया काळात प्रस्थापित राजकारण्यांविरोधात एक सक्षम तिसरा पर्याय आम्ही लोकांसमोर ठेवणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत महादेव साळुंखे, विठ्ठल पेडणेकर, परेश भोसले, वैशाली जाधव, अधिकराव पाटील, सुधीर चव्हाण, आर. बी. पाटील आदी उपस्थित होते.