Sangli: सांगलीची खासदारकीची जागा ‘स्वाभिमानी’ लढणार, राजू शेट्टींनी दिले स्पष्ट संकेत

By अविनाश कोळी | Published: August 24, 2023 05:01 PM2023-08-24T17:01:16+5:302023-08-24T17:02:09+5:30

Sangli: शेतकऱ्यांनी माझ्या जोडीला सांगली लोकसभा मतदारसंघातूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार संसदेत पाठविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले.

Sangli: 'Swabhimani' will contest Sangli MP seat, Raju Shetty gives a clear indication | Sangli: सांगलीची खासदारकीची जागा ‘स्वाभिमानी’ लढणार, राजू शेट्टींनी दिले स्पष्ट संकेत

Sangli: सांगलीची खासदारकीची जागा ‘स्वाभिमानी’ लढणार, राजू शेट्टींनी दिले स्पष्ट संकेत

googlenewsNext

- अविनाश कोळी
मालगाव - कोणताही पक्ष स्वार्थासाठी शेतकऱ्यांची बाजू घेतो, मात्र सत्ता येताच त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडतो. ही राजकीय व्यवस्था उलथून टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी माझ्या जोडीला सांगली लोकसभा मतदारसंघातूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार संसदेत पाठविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले.

मालगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल शेट्टी व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचा सत्कार उपाध्यक्ष संजय खोलकुंबे व तालुकाध्यक्ष सुरेश वावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावकार मदनाईक, मिलिंद साखरपे संजय बेले उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस सोयाबीनला आठ हजार दर मागत होते. आता सोयाबीन दर पाच हजार झाला आहे. सत्तेत असताना यावर ते बोलत नाहीत. शरद पवार सत्तेत होते त्यावेळी वीज दरावर काही बोलत नव्हते, मात्र सध्या ते वीज दरवाढीला विरोध करत आहेत. सर्वच राजकीय पक्ष सत्ता नसताना स्वार्थासाठी शेतकरी हितावर बोलतात, मात्र सत्ता मिळताच शेतकऱ्यांना विसरतात हे वास्तव आहे.

ऊस, द्राक्षासह कोणतीही शेती सध्या परवडत नाही. याचे कारण उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे. मात्र, त्या तुलनेत शेतीमालाचे भाव वाढत नाहीत. शेतकऱ्यांना कोणताच टॅक्स नाही असे अनेकजण ओरडत असतात. पण, ऊस उत्पादक शेतकरी राज्य आणि केंद्र शासनाला ३३ हजार कोटी रुपये कर देतोय. त्यामुळे आमचे उत्पन्न सिद्ध करा आणि आम्हालाही इन्कम टॅक्स लावा, असे जाहीर आवाहन त्यांनी केले.

Web Title: Sangli: 'Swabhimani' will contest Sangli MP seat, Raju Shetty gives a clear indication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.