सांगली बेकायदा गर्भपात प्रकरणाची राज्य महिला आयोगाने घेतली स्वाधिकारे दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 06:14 PM2018-09-17T18:14:59+5:302018-09-17T18:15:33+5:30

याप्रकरणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल आयोगास प्राप्त झाला आहे.

Sangli takes possession of state women's commission of miscarriage case | सांगली बेकायदा गर्भपात प्रकरणाची राज्य महिला आयोगाने घेतली स्वाधिकारे दखल

सांगली बेकायदा गर्भपात प्रकरणाची राज्य महिला आयोगाने घेतली स्वाधिकारे दखल

Next

मुंबई - सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चौगुले हॉस्पिटल येथे झालेल्या बेकायदा गर्भपात  प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे (स्यूमोटो) दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधिक्षक यांना या प्रकरणाचा तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम २००३ (पीसीपीएनडीटी) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गठित केलेल्या 'राज्य तपासणी व सनियंत्रण समिती'च्या अध्यक्षा आहेत. याप्रकरणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल आयोगास प्राप्त झाला आहे.

Web Title: Sangli takes possession of state women's commission of miscarriage case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.