सांगलीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध ; सांगलीकरांकडून शहिदांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 01:55 PM2019-02-16T13:55:01+5:302019-02-16T13:56:33+5:30
किस्तानाला भारताने अनेक वेळा संधी दिली, पण आता भारतीयांच्या सहन शक्तींचा अंत होत आहे. भारताने ठरवले तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही अशा शब्दात पाकिस्तानला इशारा देत जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला.
सांगली: पाकिस्तानाला भारताने अनेक वेळा संधी दिली, पण आता भारतीयांच्या सहन शक्तींचा अंत होत आहे. भारताने ठरवले तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही अशा शब्दात पाकिस्तानला इशारा देत जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना शनिवारी सकाळी सांगलीच्या स्टेशन चौकात साडे दहा वाजता संपूर्ण सांगलीकरांनी दोन मिनीटे स्तब्ध राहून श्रध्दांजली वाहली. यावेळी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून शहिदांना अभिवादन केले.
भारत माता की जयऽऽऽ... च्या घोषणा देत नागरिकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला. साडे नऊ पासूनच सर्वच पक्षाचे कार्यकते, विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी, आज- माजी नगरसेवक, व्यापारी, उद्योजक, वकील, डॉक्टर यांच्यासह सामान्य नागरिकांनी स्टेशन चौकात गर्दी केली होती. यावेळी भारता मात की जय, जय हिंद च्या घोषणा देण्यात येत होत्या