सांगली ते मिरज १० रुपये अन् पंढरपूरला ६५ रुपये तिकीट; : प्रवाशांसाठी दोन गाड्या उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:37 PM2024-04-01T17:37:04+5:302024-04-01T17:37:24+5:30
बसपेक्षा स्वस्त प्रवास
सांगली : सांगली स्टेशनवरून मुंबईप्रमाणेच लोकल रेल्वे गाड्यांचा लाभ प्रवाशांना होणार आहे. सांगली ते मिरज, आरग व पुढील गावांना जाताना बसपेक्षा कमी तिकिटात प्रवास करता येतो.
सांगली-मिरज लोकल रेल्वे गाडी रात्री सात वाजता सांगली स्थानकावरून सुटते. विश्रामबाग, मिरज येथे जाण्यासाठी केवळ १० रुपये द्यावे लागतील. पाच मिनिटांत विश्रामबाग अन् वीस मिनिटांत मिरजेत ही गाडी जाते.
या गाडीप्रमाणेच सांगली-पंढरपूर-कुर्डूवाडी-परळी वैजनाथ रेल्वे गाडी रात्री साडे आठ वाजता सांगली स्टेशनवरून सुटते. अशा दोन गाड्यांच्या माध्यमातून रात्री लोकल गाडीप्रमाणे प्रवास करता येतो. लोकल गाडी सर्व स्थानकांवर थांबते. त्यामुळे प्रवाशांना कमी पैशात, कमी वेळेत या गावांना प्रवास करता येतो.
रेल्वेचे तिकीट दर असे
सांगली-आरग ३०
सांगली-सलगरे ३०
सांगली-कवठेमहांकाळ ३५
सांगली-ढालगाव ४०
सांगली-जत रोड ५०
सांगली-सांगोला ५५
सांगली-पंढरपूर ६५
सांगली-मोडनिंब ७५
सांगली-कुर्डूवाडी ८०
सांगली-बार्शी ९०
सांगली-धाराशिव १००
सांगली-येडशी १०५
सांगली-ढोकी ११०
सांगली-औसा १२०
सांगली-लातूर १२५