सांगलीत पावसाचा जोर ओसरला, ढगांची दाटी कायम; नदी पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 09:45 PM2019-09-26T21:45:43+5:302019-09-26T21:48:00+5:30
गेल्या चोवीस तासात जिल्'ाच्या सर्वच भागात कमी पाऊस नोंदला गेला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारीही मध्यम किंवा तुरळक स्वरुपाचा पाऊस होणार असून शनिवारपासून पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे
सांगली : जिल्'ात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी दम टाकला असून, गेल्या चोवीस तासात जिल्'ात सरासरी १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्'ाच्या बहुतांश भागात अजूनही ढगांची दाटी कायम आहे. धरणातून विसर्ग सुरुच असल्याने कृष्णा नदी पातळीत वाढ होत आहे.
गेले दोन दिवस पावसाने सांगली जिल्'ाला झोडपून काढले. दुष्काळी भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन दिवसांच्या जोरदार हजेरीनंतर गुरुवारी पावसाचा जोर ओसरला. गेल्या चोवीस तासात जिल्'ाच्या सर्वच भागात कमी पाऊस नोंदला गेला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारीही मध्यम किंवा तुरळक स्वरुपाचा पाऊस होणार असून शनिवारपासून पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांच्या पावसाने जिल्'ाच्या दुष्काळी भागासह सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले. नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले. पलूस, शिराळा, कडेगाव, खानापूर तालुक्यातील अनेक मार्ग पावसाच्या पाण्यामुळे बंद करावे लागले. बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी पहाटे काही वेळ पाऊस झाला आणि सकाळपासून पावसाने उघडीप दिली. तरीही ढगांची दाटी सर्वत्र कायम आहे.
गेल्या दोन दिवसात कोयना धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीपात्रात वाढ होत आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सांगलीतील कृष्णा नदीची पातळी २५ फुटांवर गेली होती. अंकलीत २७.७ फूट इतकी पातळी आहे. गुरुवारी सकाळी विसर्ग कमी करण्यात आल्याने शुक्रवारी पुन्हा नदी पातळीत घट होण्याची चिन्हे आहेत. वारणा धरण शंभर टक्के भरले असून कोयना धरणातही ९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. कालवा व विद्युतगृहाद्वारे वारणा धरणातून १ हजार २४५ क्युसेक, तर कोयना धरणातून २ हजार १00 क्युसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून ५७ हजार ७४0 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होऊ नये, अशी अपेक्षा आता केली जात आहे. यापुढे पावसाच्या पाण्याची धरणात जेवढी आवक होईल, तेवढा विसर्ग सोडावा लागणार आहे.
जिल्'ातील पाऊस मि.मी.
(गुरुवारी सकाळपर्यंत)
तालुका पाऊस आजपर्यंतचा एकूण
इस्लामपूर-वाळवा ९ ७८७.१
पलूस ३ ५0६.५
तासगाव १ ४६७.४
मिरज ५.२ ५९५.४
शिराळा १३ १९४९.५
विटा-खानापूर १६ ४५८
आटपाडी ६ २६१.८
कवठेमहांकाळ २.१ ३७३.८
जत ३ २५३
कडेगाव १६ ८९२.६