सांगली : वसंतदादांच्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच डबघाईला : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 09:37 PM2018-09-22T21:37:38+5:302018-09-22T21:38:09+5:30

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. सहकाराचा स्वाहाकार झाल्यामुळे व त्या व्यवस्थित चालविल्या नाहीत म्हणून डबघाईला आल्या आहेत, अशी खंत

Sangli: Vasantdada's organization dubghaiyala during his birth centenary: Subhash Deshmukh | सांगली : वसंतदादांच्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच डबघाईला : सुभाष देशमुख

सांगली : वसंतदादांच्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच डबघाईला : सुभाष देशमुख

Next
ठळक मुद्देदादांच्या वारसांवर टीका; जतमध्ये कार्यक्रम

जत : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. सहकाराचा स्वाहाकार झाल्यामुळे व त्या व्यवस्थित चालविल्या नाहीत म्हणून डबघाईला आल्या आहेत, अशी खंत सहकार व सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी व्यक्त केली.
जत तालुका लायन्स क्लबच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व उल्लेखनीय काम केलेल्या पतसंस्थाचालकांचा सत्कार देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. हे क्लेशकारक आहे. पुस्तकातील ज्ञानासोबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यवहारातील ज्ञान शिकविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेती व्यवसाय संध्या संकटात आहे. शेतकरी समृद्ध झाला, तर राष्ट्र वैभवशाली होईल.

आमदार विलासराव जगताप म्हणाले की, समाजात चांगल्या शिक्षकांची वानवा असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ऱ्हास होत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर म्हणाले की, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून समाजात काम करणाऱ्या सर्वच सहकारी संस्थांचा सन्मान होणे आवश्यक आहे. पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षणाची हमी हा शासनाचा धाडसी निर्णय आहे.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी प्रास्ताविक केले. गोपाल बजाज यांनी मनोगत व्यक्त केले. बालगाव मठाचे प्रमुख अमृतानंद महास्वामी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, दिनकर पतंगे, आप्पासाहेब नामद, डॉ. भरत हेशी, डॉ. विद्याधर किट्टद, प्रभाकर जाधव, सरदार पाटील, राजू आरळी, रेणुका आरळी, बसवराज बिराजदार, अ‍ॅड. श्रीपाद आष्टेकर, चंद्रकांत गुड्डोडगी, आर. के. पाटील आदी उपस्थित होते. संदीप लोणी यांनी आभार मानले.


 जत येथील कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अमृतानंद महास्वामीजी, डॉ. रवींद्र आरळी, तम्मणगौडा रवी-पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Sangli: Vasantdada's organization dubghaiyala during his birth centenary: Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.