Sangli: ग्रामीण साहित्यातील 'वसंत' सरला, ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:30 AM2024-04-24T10:30:52+5:302024-04-24T10:31:27+5:30
Sangli News: सांगलीचे सुपुत्र व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे (वय ७९ ) आज सकाळी ८.३० वाजता निधन झाले.
सांगली - सांगलीचे सुपुत्र व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे (वय ७९ ) आज सकाळी ८.३० वाजता निधन झाले.
वसंत केशव पाटील यांचे मूळ गाव कुमठे (ता. तासगाव, जि. सांगली) आहे. रयत शिक्षण संस्थेतून शिक्षक म्हणून सेवा सुरू केली आणि हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. ग्रामीण मराठी व हिंदी साहित्यात त्यांनी मोठे योगदान दिले. मूळ हिंदी लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या 'दशव्दार ते सोपान ' या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादासाठी वसंत केशव पाटील यांना १९९६ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्यांना राज्य सरकारकडून साहित्य निर्मितीचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
यशवंतराव: विचार आणि वारसा, छप्पर, आधुनिक शिक्षा शिल्पी : कर्मवीर भाऊराव पाटील, कंदिलाचा उजेड, सहीमागाचा माणूस असे त्यांनी कादंबरी, कथा, अनुवाद व कविता यामध्ये विपुल लेखन केले. 'केशवसुतांच्या निवडक कविता' असे नवे पुस्तक त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावर होते.
वसंत केशव पाटील यांचे अंत्यसंस्कार अमरधाम, सांगली येथे बुधवारी दुपारी होणार आहेत.