सांगली : कोयना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:25 PM2018-09-01T16:25:10+5:302018-09-01T16:30:41+5:30
आजअखेर झालेल्या चांगल्या पावसामुळे कोयना धरण हे 99 टक्के भरलेले आहे. दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजीचा पाणीसाठा 104.47 टी.एम.सी. इतका आहे.
Next
ठळक मुद्देकोयना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशाराकार्यकारी अभियंता कुमार पाटील यांचे आवाहन
सांगली : आजअखेर झालेल्या चांगल्या पावसामुळे कोयना धरण हे 99 टक्के भरलेले आहे. दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजीचा पाणीसाठा 104.47 टी.एम.सी. इतका आहे.
सध्या धरणाची साठवण क्षमता अत्यल्प राहिली आहे. त्यामुळे यापुढे धरणातून पाण्याचा विसर्ग सोडताना पूर्व कल्पना देण्यास कालावधी मिळणार नाही. तरी कोयना व कृष्णा नदी काठावरील गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये.
वीज, मोटारी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य व पशुधन यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.