सांगलीत चाकूच्या धाकाने दोघांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:23 AM2021-01-02T04:23:24+5:302021-01-02T04:23:24+5:30

सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावर रात्रीच्या सुमारास टेम्पो थांबवून जेवण करीत बसलेल्या दोघांना चाकूने मारून जखमी करीत लुटले. ...

Sangli was robbed by a knife | सांगलीत चाकूच्या धाकाने दोघांना लुटले

सांगलीत चाकूच्या धाकाने दोघांना लुटले

Next

सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावर रात्रीच्या सुमारास टेम्पो थांबवून जेवण करीत बसलेल्या दोघांना चाकूने मारून जखमी करीत लुटले. त्यांच्याकडील ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी अरमान हमजा खान (रा. इचलकरंजी) याने शहर पोलिसांत फिर्याद दिली असून सैफ महंमद पटेल (वय २०) व समीर रमजान नदाफ (३२, दोघेही रा. नळभाग, सांगली) या संशयितांना पाेलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इचलकरंजी येथील अरमान खान हा तरुण सुफीयान खान या मित्रासमवेत टेम्पोने सांगलीत आला होता. रात्री अकराच्या सुमारास तो बसस्थानकाच्या मार्गावर एका औषध दुकानाजवळ टेम्पो थांबवून जेवण करीत बसला होता. यावेळी संशयित तिथे आले व त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात चाकूने मारीत त्यास जखमी केले. त्याच्याकडील ७०० रुपयांची रोकड काढून घेतली. पोलिसांनी तातडीने शाेध घेत दोघांना अटक केली.

Web Title: Sangli was robbed by a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.