राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेत सांगलीला तीन सुवर्णांसह नऊ पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:26 AM2021-04-02T04:26:25+5:302021-04-02T04:26:25+5:30
सांगली : हरियाणा सिरसा येथे सॅम्बो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या अकराव्या राष्ट्रीय सॅम्बो (कुस्ती) चॅम्पियनशिप स्पर्धेत सांगली ...
सांगली : हरियाणा सिरसा येथे सॅम्बो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या अकराव्या राष्ट्रीय सॅम्बो (कुस्ती) चॅम्पियनशिप स्पर्धेत सांगली जिल्ह्याला एकूण नऊ पदके मिळाली. यामध्ये सुवर्णपदक मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची तुर्कस्तानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
तीन सुवर्ण, तीन रौप्यपदक तर तीन कांस्यपदके मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये सानिका जाधव, योगिता शिंदे, सृष्टी पवार यांनी सुवर्णपदक मिळविले. हर्षल रोकडे, उज्ज्वल कादियान, तन्वी दिवटे यांनी रौप्यपदक तर पौर्णिमा जाधव, मानतेश दोडमनी, सानिका काटकर यांनी कांस्य पदक मिळविले.
त्यांना महाराष्ट्र सॅम्बो असोसिएशनचे सेक्रेटरी अनुप नाईक, सांगली जिल्हा सचिव डॉ. रवींद्र पवार, सोनी स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक आसिफ मुजावर, डॉ. गौरव जाधव, पै. करण पवार, अतुल फासे, अक्षय बामनकर, विनोद बाबर यांचे मार्गदर्शन लाभले.