सांगली : चिंचणीतील शिवस्मारकाचे काम पूर्ण, लवकरच उदघाटन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 03:30 PM2018-08-17T15:30:08+5:302018-08-17T15:33:18+5:30

चिंचणी तालुका कडेगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक स्मारक साकारले आहे.या स्मारकाचे व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे .यामुळे शिवछत्रपतींचा दिमाखदार अश्वारूढ पुतळा शिवप्रेमींचे आकर्षण व प्रेरणास्थान ठरत आहे .या शिवस्मारकाचा उदघाटन व लोकार्पण सोहळा लवकरच संपन्न होणार आहे.

Sangli: The work of Chinnachi Shivsmamar is completed, soon the inauguration ceremony |  सांगली : चिंचणीतील शिवस्मारकाचे काम पूर्ण, लवकरच उदघाटन सोहळा

चिंचणी (ता. कडेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक शिवस्मारक़

googlenewsNext
ठळक मुद्देचिंचणीतील शिवस्मारकाचे काम पूर्ण, लवकरच उदघाटन सोहळाअश्वारूढ पुतळा शिवप्रेमींचे प्रेरणास्थान

कडेगाव :चिंचणी तालुका कडेगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक स्मारक साकारले आहे. या स्मारकाचे व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे शिवछत्रपतींचा दिमाखदार अश्वारूढ पुतळा शिवप्रेमींचे आकर्षण व प्रेरणास्थान ठरत आहे. या शिवस्मारकाचा उदघाटन व लोकार्पण सोहळा लवकरच संपन्न होणार आहे .

भावी पिढीला स्फूर्ती मिळावी यासाठी पाच वर्षांपूर्वी सन २०१३ मध्ये सागरेश्वर सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या संकल्पनेतून चिंचणी येथे शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारणीचा निर्धार येथील शिवप्रेमी तरुण व ग्रामस्थांनी केला.

माजी मंत्री स्व. आमदार डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीची शासन मान्यता मिळाली. १ जानेवारी २०१५ रोजी या कामाचे भूमिपूजन झाले. पुतळा समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५० लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली.

नागपूर येथील पॉवर ग्रीड फाउंडेशनच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी परिसर सुशोभिकरणासाठी १५ लाख रुपयांचा निधी मिळवून दिला तसेच आमदार फंडातून विद्युत रोषणाईसाठी ६ लाख रुपयांचा निधी दिला.  

पुणे येथील बी. आर. खेडकर या प्रसिद्ध मुतीर्कारांनी १० फूट उंचीचा आणि ४ टन वजनाचा शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा साकारला .गावातील शिवप्रेमी तरुणांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून १८५० किलोमीटर धावत २० एप्रिल २०१५ रोजी शिवज्योत गावात आणली.

याच दिवशी पारंपारिक शिवजयंतीची औचित्य साधून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. जवळपास ५० लाख रुपये इतक्या निधीतून येथील शिवस्मारकाचे काम आता पूर्ण झाले आहे. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणी आणि चौक सुशोभीकरण व विद्युत रोषणाई आदी कामे पूर्ण झाल्यामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे .

राजकिय नेतेमंडळींडुन कौतुक

आमदार मोहनराव कदम, आमदार डॉ.विश्वजीत कदम व सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी येथील शिवस्मरकाचे दर्शन घेऊन या आदर्शवत कामाचे कौतुक केले .

चिंचणीचे वैभव आणि ग्रामस्थांचा उत्साह 

ग्रामपंचायत स्तरावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे ऐतिहासिक काम चिंचणी येथे झाले. येथील आकर्षक शिवस्मारक गावचे वैभव ठरत आहे .यामुळे शिवप्रेमी तरुण व ग्रामस्थांत उत्साहाचे वातावरण आहे .

Web Title: Sangli: The work of Chinnachi Shivsmamar is completed, soon the inauguration ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.