मजूर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:31 AM2021-09-24T04:31:23+5:302021-09-24T04:31:23+5:30
सांगलीत सहकारी संघात मजूर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. यावेळी डॉ. प्रताप पाटील, संगीता खोत, एन. एम. हुल्याळकर आदी उपस्थित ...
सांगलीत सहकारी संघात मजूर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. यावेळी डॉ. प्रताप पाटील, संगीता खोत, एन. एम. हुल्याळकर आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मजूर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची तीनदिवसीय कार्यशाळा झाली. राष्ट्रीय सहकार शिक्षा केंद्र व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने आयोजन केले होते. बाजार समिती आवारातील गुलाबराव पाटील सहकार प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील मजूर संस्थांचे पदाधिकारी कार्यशाळेसाठी उपस्थित होते.
सहकारी संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक डॉ. प्रताप पाटील यांच्या उपस्थितीत समारोप झाला. ते म्हणाले, प्रशिक्षणासाठी वयाची अट नसते, त्यामुळे नवनवीन माहिती घेऊन ज्ञानाच्या कक्षा विस्तारित करायला हव्यात. त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सहकारी संघ व जिल्हा सहकारी बोर्डाच्या माध्यमातून अशा कार्यशाळा नियमितपणे होत असतात, याचा लाभ घेतला पाहिजे.
यावेळी बाजार समितीचे सचिव व संघाचे संचालक एन. एम. हुल्याळकर, सुभाष खोत आदी उपस्थित होते. माजी महापौर व प्रशिक्षणार्थी संगीता खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.