इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सांगलीत युवक काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:31+5:302021-06-06T04:20:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने निषेध आंदोलन केले. स्टेशन रस्त्यावरील पेट्रोल पंपावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने निषेध आंदोलन केले. स्टेशन रस्त्यावरील पेट्रोल पंपावर मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी नेतृत्व केले. ते म्हणाले की, मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या वणव्यात ढकलले आहे. ते सर्वसामान्यांना परवडतील असे कमी करावेत, अन्यथा युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करेल. शहर अध्यक्ष सुहेल बलबंड म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये हजारोंना रोजगार गमवावे लागले आहेत. त्यांच्या घरात चूल पेटणे कठीण झाले आहे. या स्थितीत मोदी सरकार इंधनाची दरवाढ करत असल्याने जगणे कठीण झाले आहे. काँग्रेसच्या काळात पेट्रोलचे ५५ रुपये झाले होते, तेव्हा भाजपने देशभरात आंदोलने केली होती. आता त्यांच्याच सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर दुपटीने वाढवले आहेत. पण भाजपचे नेते, कार्यकर्ते मूग गिळून गप्प बसले आहेत.
आंदोलनात संभाजी पाटील, उत्कर्ष खाडे, आशिष चौधरी, प्रथमेश जाधव, अरबाज शेख, शैलेश शेजाळ, ताजुद्दीन शेख, शुभम हुलवाणे, तौफीक शिकलगार, प्रशांत अहिवळे, गौरव गायकवाड, हिरा कांबळे, ओंकार कांबळे, अजय माने आदींनी भाग घेतला.