अनैतिक संबंधाच्या संशयावरून सांगलीत तरुणाला भोसकले, तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 05:10 PM2022-06-07T17:10:36+5:302022-06-07T17:11:01+5:30

हेगडे खाली पडल्याने तो मेला, असे समजून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. थोड्यावेळाने जखमी हेगडे उठून बसला व जखमी अवस्थेतच तो नांद्रेच्या दिशेने गेला. मात्र, तो तिथे पडला. नांद्रे येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Sangli youth stabbed on suspicion of immoral relationship, charges filed against three | अनैतिक संबंधाच्या संशयावरून सांगलीत तरुणाला भोसकले, तिघांवर गुन्हा दाखल

अनैतिक संबंधाच्या संशयावरून सांगलीत तरुणाला भोसकले, तिघांवर गुन्हा दाखल

Next

सांगली : शहरातील कर्नाळ रोडवर अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाला चाकूने भोसकण्यात आले. चंद्रकांत ऊर्फ पप्पू उत्तम हेगडे (वय २९, रा. नवीन वसाहत, सांगली) असे जखमी तरुणाचे नाव असून, याप्रकरणी संशयित समीर इक्बाल नदाफ, अल्ताफ इक्बाल नदाफ (रा. मौजे डिग्रज) आणि अमित ऊर्फ भय्या भिसे या तिघांविरूद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नवीन वसाहत परिसरात राहणारा जखमी हेगडे हा पूर्वी समारंभामध्ये वाढपी म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने हे काम बंद करून गवंडी काम सुरू केले होते.

वाढपी काम करत होता त्यावेळी त्याची समीर व अल्ताफ यांच्याशी ओळख झाली होती. हेगडेचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय या दोघांना होता. याचा जाब विचारण्यासाठी संशयितांनी हेगडेला रविवारी रात्री बोलावून घेतले होते. कर्नाळ रोडवर रात्री सव्वाबाराच्या सुमारास शिवीगाळ करत हेगडे याला चाकूने भोसकले. यात हेगडे खाली पडल्याने तो मेला, असे समजून तिघांनी घटनास्थळावरून पलायन केले.

थोड्यावेळाने जखमी हेगडे उठून बसला व जखमी अवस्थेतच तो नांद्रेच्या दिशेने गेला. मात्र, जखमी अवस्थेत तो तिथे पडला. नांद्रे येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचारानंतर त्याने तिघा संशयितांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangli youth stabbed on suspicion of immoral relationship, charges filed against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.