सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी बदल नेत्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:17 AM2018-08-30T00:17:29+5:302018-08-30T00:17:56+5:30

Sangli Zilla Parishad office bearer headache for change leaders | सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी बदल नेत्यांसाठी डोकेदुखी

सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी बदल नेत्यांसाठी डोकेदुखी

googlenewsNext
ठळक मुद्देसत्ताधारी कोंडीत : बाबर, घोरपडे, शेट्टी, महाडिक गटाचे मत निर्णायक

अशोक डोंबाळे ।
सांगली : जिल्हा परिषदेत भाजपला काठावरचे बहुमत असल्यामुळे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री अजितराव घोरपडे, नानासाहेब महाडिक यांनी हिरवा कंदील दाखविला, तरच पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करायची भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. या नेत्यांना डावलून पदाधिकाºयांचे राजीनामे घेतल्यास भाजपचे जिल्हा परिषदेतील सत्तेचे गणित बिघडण्याची भीती आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

जिल्हा परिषदेत भाजपकडे २५ सदस्य संख्या असून, बहुमतासाठी त्यांना सहा सदस्यांची गरज आहे. पहिल्या टप्प्यातील सव्वा वर्षासाठीचे गणित जमविताना शिवसेना तीन, रयत विकास आघाडी चार, विकास आघाडी दोन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक अशा दहा सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे पस्तीसवर सदस्यसंख्या पोहोचली होती. या मित्रपक्षांपैकी शिवसेना, रयत विकास आघाडीला सत्तेत सामावून घेण्यात आले आहे; पण घोरपडे आणि शेट्टी समर्थकांना सत्तेत संधी दिलेली नव्हती. पुढील कालावधित या सदस्यांना संधी देण्याचे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिल्याचे समजते. मात्र खा. शेट्टींनी भाजपपासून फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक केली आहे. त्यामुळे भाजपकडे ३४ सदस्य संख्या राहणार आहे.

खा. संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्यातील संघर्षही टोकाला गेला आहे. घोरपडे यांनी सध्या भाजपपासून फारकत घेत राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांचे दोन सदस्य आहेत. शिवसेनेचे तीन सदस्य असून, आ. अनिल बाबर यांचे भाजपच्या एका गटाशी जुळते, तर दुसºया गटाशी जुळत नाही. आ. बाबर यांचे पुत्र सुहास सध्या जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष आहेत.

आ. बाबर यांच्याशी संपर्क साधला असता, भाजपने अध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करू. नानासाहेब महाडिक समर्थक रयत विकास आघाडीत दोन सदस्य असल्यामुळे त्यांचीही भूमिका निर्णायक आहे. या सर्वांचे गणित जमविल्याशिवाय पदाधिकाºयांचे राजीनामे घ्यायचे नाहीत, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. मात्र दुसरीकडे भाजपच्या दुसºया गटाचे सध्याच्या पदाधिकाºयांशी फारसे जमत नसल्याने काही सदस्यांमार्फत पदाधिकारी बदलाच्या मागणीने उचल खाल्ली आहे. या सदस्यांना भाजपचे नेते कसे शांत करणार, हेही महत्त्वाचे आहे. येत्या दोन दिवसांत भाजपच्या कोअर कमिटीमध्ये यावर फैसला होण्याची अपेक्षा आहे.

दावेदार : तीन तालुक्यातील सदस्य
विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या निवडीवेळी भाजपअंतर्गत मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. खासदार संजयकाका पाटील यांनी चुलते डी. के. पाटील यांना अध्यक्षपद मिळावे, असा आग्रह धरला होता. पण पाटील यांची ती संधी हुकली. सध्या त्यांनी पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कवलापूर (ता. मिरज) गटातून भाजपचा विजय खेचून आणलेले शिवाजी डोंगरे हेही अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. मागील निवडीवेळी त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्जही भरला होता. त्यांना सव्वा वर्षानंतर अध्यक्षपदाची संधी देण्याचे आश्वासन देऊन भाजपच्या नेत्यांनी शांत केले होते. आता जत तालुक्यातून भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून गेल्यामुळे तालुक्याला अध्यक्षपदाची संधी द्यावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. हा कलह लक्षात घेता, नूतन पदाधिकारी निवड भापजच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. पदाधिकारी बदलाच्या निमित्ताने भाजपच्या दोन गटातील संघर्षही पाहायला मिळणार आहे.

निर्णय मुख्यमंत्रीच घेतील : पृथ्वीराज देशमुख
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाबाबत योग्य तो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची कोअर कमिटीच घेणार आहे. पक्षाच्या आदेशानुसार पदाधिकारी बदल होतील, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.

पदाधिकारी बदलाबाबत सदस्य आणि पक्षाचे नेते, मित्रपक्ष, संघटनांच्या नेत्यांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. त्यानंतर पदाधिकारी बदलाबाबत धोरणात्मक निर्णय होईल. जत तालुक्यातील भाजपची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे ज्यावेळी बदल होईल, त्यावेळी अध्यक्षपदावर आमचा दावा राहील,
- आ. विलासराव जगताप, जत

Web Title: Sangli Zilla Parishad office bearer headache for change leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.