सांगलीत आयाराम-गयाराम फॉर्म्युला हिट - सांगली महापालिका रणांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:57 PM2018-03-29T23:57:53+5:302018-03-29T23:57:53+5:30

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर स्थानिक नेते, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा बदलण्यास सुरूवात केली आहे.

 Sangliat Ayuram-Garram Formula Hits - Sangli Municipal Battlefield | सांगलीत आयाराम-गयाराम फॉर्म्युला हिट - सांगली महापालिका रणांगण

सांगलीत आयाराम-गयाराम फॉर्म्युला हिट - सांगली महापालिका रणांगण

Next
ठळक मुद्दे समीकरणे बदलणार : निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलासाठी चढाओढ, सर्वपक्षीयांची डोकेदुखी वाढणार

शीतल पाटील ।
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर स्थानिक नेते, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा बदलण्यास सुरूवात केली आहे. विविध पक्षनेत्यांची गाठभेट घेऊन गुपचूप तिकिटावर दावा केला जात आहे. गेल्या दोन ते तीन निवडणुका पाहता, आयाराम-गयाराम फॉर्म्युला चांगलाच हिट ठरला आहे. यंदाही अनेक नगरसेवक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याच्या तयारीत आहेत.

महापालिकेच्या निवडणुका जून-जुलै महिन्यात होत आहेत. त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. नव्याने चारसदस्यीय प्रभाग रचनेत मोठे प्रभाग झाल्याने संभाव्य उमेदवारांची दमछाक होणार आहे. १५ ते २० हजार मतदारसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना धडपड करावी लागेल. त्यातच आता निवडणुकीच्या तोंडावर दलबदलूंच्या चर्चेला उधाण आले आहे. तसे पाहता यापूर्वीच्या निवडणुकीतही पक्षनिष्ठा खुंटीला गुंडाळून इतर पक्षात जाणाºयांची संख्या काही कमी नव्हती. यंदाही तोच प्रकार लवकरच पाहण्यास मिळणार आहे.

महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. तेव्हा जनता दल हा पालिकेत विरोधी पक्ष होता. राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि काँग्रेसमधील मदन पाटील गट राष्ट्रवादीत गेला. या गटाने जनता दलाशी युती केली. २००३ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत सरळ लढत झाली. कोणालाच बहुमत न मिळाल्याने मिरज संघर्ष समितीचा आधार घ्यावा लागला. त्यानंतर मदन पाटील आमदार झाले आणि ते काँग्रेसमध्ये आले. २००८ च्या निवडणुकीत काँग्रेसमधील सुरेश आवटी, मैनुद्दीन बागवान, संजय बजाज असा मोठा गट जयंत पाटील यांच्याकडे गेला, तर २०१३ च्या निवडणुकीत सुरेश आवटी, इद्रिस नायकवडी हा गट पुन्हा काँग्रेसवासी झाला आणि पालिकेची सत्ता काँग्रेसच्या हाती आली. त्यामुळे आयाराम-गयाराम संस्कृती तशी सांगलीकरांना नवी राहिलेली नाही.

यंदाच्या निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. प्रभाग रचना जाहीर होताच काही पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी दुसºया पक्षांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. त्यात सर्वाधिक मोठा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. नव्या प्रभाग रचनेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे वॉर्डच संपुष्टात आले आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रभागात राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसमोर काँग्रेस अथवा भाजप हेच पर्याय राहिले आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली, तर उमेदवारीचा प्रश्नही आहेच. त्यामुळे अनेकांनी भाजप नेत्यांशी संधान साधण्यास सुरूवात केली आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षात दलबदलूंची चर्चा जोरात सुरू आहे. निष्ठावंतांकडून अशा दलबदलूंना विरोध होत असला तरी, वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत घातली जात आहे.जसजशा निवडणुका जवळ येतील, तसे सर्वच राजकीय पक्ष नीतीमत्ता बाजूला ठेवून आयाराम-गयारामच्या स्वागतासाठी सज्ज होतील. कोणत्याही परिस्थितीत केवळ सत्ता मिळविणे हाच उद्देश त्यांच्यासमोर असल्याने आतापर्यंत पक्षासाठी राबणाºया कार्यकर्त्यांना काही तरी आमिष दाखवून शांतही केले जाईल.

मिरज पॅटर्नवर : राजकीय गणिते
महापालिकेच्या राजकीय पटलावर ‘मिरज पॅटर्न’चा दणका आतापर्यंत कॉँग्रेस व राष्ट्रवादीने अनुभवला आहे. मिरजेत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष पालिकेत सत्तेवर येतो, हा इतिहास पाहता, यंदा सर्वच राजकीय पक्षांनी मिरजेकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पण यंदाच्या निवडणुकीत मिरजेतील जागाही कमी झाल्या आहेत. मिरजेत नेमके कोण कोणत्या पक्षात आहे, हे खुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सांगता येत नाही. सकाळी एका पक्षात असलेला नेता दुपारी दुसºयाच पक्षात, तर रात्र होईपर्यंत तो तिसºया पक्षाच्या नेत्यासोबत दिसून येतो. सुरेश आवटी, शिवाजी दुर्वे ही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, तर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान हे संघर्ष समितीतून मैदानात उतरतील, असेही बोलले जाते. त्यामुळे अगदी निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तेथील संभाव्य उमेदवारांचा पक्ष कोणता, हे सांगणे कठीण आहे.

Web Title:  Sangliat Ayuram-Garram Formula Hits - Sangli Municipal Battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.