सांगलीत सूत गोदामाला भीषण आग; पाच लाखांचे नुकसान
By Admin | Published: July 10, 2017 07:07 PM2017-07-10T19:07:20+5:302017-07-10T19:21:43+5:30
माधवनगर रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथील सल्लाउद्दीन खान यांच्या घराच्या दुस-या मजल्यावरील सूत गोदामास भीषण आग लागली.
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 10 - माधवनगर रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथील सल्लाउद्दीन खान यांच्या घराच्या दुसºया मजल्यावरील सूत गोदामास भीषण आग लागली. या आगीत सूत व तसेच भंगाराचे साहित्य जळून खाक होऊन पाच लाखांचे नुकसान झाले आहे. सोमवारी दुपारी चार वाजता ही दुर्घटना घडली. महापालिकेच्या अग्नीशमनच्या दलाच्या सात गाड्यांनी आग विझविली.
सल्लाउद्दीन खान व त्यांचा भाऊ फारुख खान हे दोघे एकत्रित राहतात. त्यांचे तिनमजली घर आहे. तीस सदस्यांचे हे कुटूंब आहे. त्यांचा कारखान्यातील टाकाऊ सूत व प्लॅस्टिकचे साहित्य खरेदीचा कारखाना आहे. हे साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी दुसºया मजल्यावर गोदाम केले आहे. या गोदामातून दुपारी धुराचे लोट येत असल्याचे शेजा-यांनी पाहिले. शेजाºयांनी खान यांना माहिती दिली. खान कुटूंबातील सर्वांना सुरक्षित घरातून बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत आगीची व्याप्ती वाढली गेली. महापालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमनच्या एका-पाठो-एक अशा सात गाड्या लागल्या. सूत असल्याने आग केवळ धुपत होता. काठीने हलवित पाण्याचा मारा करीत आग विझविण्याचे काम सुरु होते.
दुसºया मजल्यावरील आगीच्या ज्वाला व धूराच्या ज्वाला तिस-या मजल्यावरही गेल्या. त्यामुळे तिथेही आग लागली. परिसरातील काही तरुण तिसºया मजल्यावर गेले. त्यांनी छताचा सिमेंटचा पत्रा लोखंडी अँगलने फोडून धूर व आगीज्या ज्वालांना वाट बाहेर जाण्यास वाट करुन दिली. तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यामध्ये सूत व प्लॅस्टिकचे साहित्य जळून खाक होऊन पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. खान यांनी घराजवळ पत्र्याचे शेड मारुन त्यामध्येही सूताचे गठ्ठे ठेवले आहेत. तिथे आग लागू नये, यासाठी तेही अन्यत्र ठिकाणी हलविले. आगीत घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. घटनास्थळी उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, अग्निशमन अधिकारी शिवाजीराव दुधाळ, संजयनगरचे पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदिवे यांनी भेट देऊन पाहणी केली.
सिलिंडर बाहेर काढले-
आगीच्या ज्वाला व धुराचे लोट संपूर्ण इमारतीमध्ये पसरले होते. त्यामुळे आग विझविताना अग्नीशनच्या जवानांना खूप त्रास झाला. पहिल्या मजल्यावर घरात दोन भरलेले सिलिंडर होते. याची माहिती मिळताच जवानांना हे दोन्ही सिलिंडर सुरक्षित बाहेर काढून त्यावर पाण्याचा मारा केला. घटनास्थळी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.