सांगलीकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 01:35 PM2019-05-07T13:35:59+5:302019-05-07T13:38:48+5:30
सावली गायब होण्याच्या खगोलीय चमत्काराचा अनुभव सांगलीकरांनी मंगळवारी घेतला. दुपारी बारा वाजल्यापासून काही मिनिटे सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावल्या अदृश्य झाल्या. या खगोलीय घटनेचा आनंद अनेकांनी लुटला.
सांगली : सावली गायब होण्याच्या खगोलीय चमत्काराचा अनुभव सांगलीकरांनी मंगळवारी घेतला. दुपारी बारा वाजल्यापासून काही मिनिटे सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावल्या अदृश्य झाल्या. या खगोलीय घटनेचा आनंद अनेकांनी लुटला.
सांगलीत दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी सावल्यांच्या लपाछपीचा खेळ सुरू झाला. काही मिनिटातच पुन्हा सावल्या पूर्ववत दिसू लागल्या. खगोलीय चमत्काराच्या या घटनांचा आनंद विज्ञानप्रेमींसह नागरिकांनी लुटला. गेल्या काही दिवसांपासून आकाश निरभ्र असल्यामुळे हा खगोलीय खेळ पाहण्याचा आनंद नागरिकांना मिळू शकला.
सांगलीत दरवर्षी विज्ञानप्रेमी संघटनांकडून शून्य सावलीनिमित्त वेगवेगळे प्रयोग केले जातात. यंदाही काचेच्या टिपॉयवर वेगवेगळ्या वस्तू ठेवून त्यांची सावली गायब होतानाचे प्रयोग दाखविण्यात आले. यंदा वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा दिवस अनुभवता येणार आहे.
मराठी विज्ञान परिषद आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या दोन दिवसांपूर्वी शून्य सावली कशी अभ्यासावी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे मंगळवारी प्रत्यक्ष या प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी अनुभवले. या खगोलीय घटनेविषयी
का होते असे...
कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षातून दोनवेळेला हा शू्न्य सावलीचा अनुभव घेता येतो. पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते त्याला २३.५ डिग्रीएवढा कल आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या मार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. पृथ्वी ही कर्कवृत्तावरून बरोबर ३ महिन्यांनी वसंत संचात बिंदूपाशी येते. यादिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो. वेगवेगळ्या वृत्तांवर वेगवेगळ्या काळात शून्य सावलीचा अनुभव येत असतो.