सांगलीकर नागरिकांच्या माथी अजूनही जड पाणीच..!

By admin | Published: December 28, 2015 11:51 PM2015-12-28T23:51:30+5:302015-12-29T00:54:00+5:30

सांगलीकर नागरिकांच्या माथी अजूनही जड पाणीच..! मिरजेत शून्य जडत्व : पाणी शुद्धीकरणाचा ढिसाळ कारभार

Sangliikar is still very important for the citizens! | सांगलीकर नागरिकांच्या माथी अजूनही जड पाणीच..!

सांगलीकर नागरिकांच्या माथी अजूनही जड पाणीच..!

Next

सांगली : महापालिकेकडून सांगलीतील नागरिकांना पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात ३.६ मिलिग्रॅम जडत्व आढळून आले आहे. याउलट मिरजेतील पाणी शुद्ध आहे. महापालिकेच्या शुद्धीकरण यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या माथी जड पाणी मारले जात आहे.
सांगलीकरांच्या नशिबी नेहमीच दूषित पाणी आहे काय, अशी शंका उपस्थित होते. कधी शेरीनाल्याचे सांडपाणी नदीपात्रात मिसळते, तर कधी हिरव्या, पिवळ्या पाण्याचा पुरवठा होतो. नागरिकांना शुद्ध पाणी कधी मिळणार, ही समस्या सुटणार की नाही, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत. गॅस्ट्रो, अतिसाराचे रुग्ण शहराच्या कानाकोपऱ्यात आढळून येत असतात. त्यावर जुजबी कार्यवाही होते आणि पुन्हा तशीच अवस्था सुरू राहते.
त्यात आता पाण्याच्या जडपणाची भर पडली आहे. स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी रविवारी सांगली व मिरज शहरातील जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट दिली. या भेटीत पाटील यांना मिरजेतील पाण्यात जडपणा आढळून आला नाही. उलट सांगलीच्या पाण्यात मात्र ३.६० मिलिगॅॅ्रम जडपणा होता. या प्रकाराला शुद्धीकरण केंद्राचा ढिसाळ कारभारच कारणीभूत आहे. शासनाने पाण्यात तुरटी वापरास बंदी घातली आहे. त्यामुळे महापालिकांना पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर व पीएसएल पावडर मिसळण्यात येत आहे. सांगलीत ही पावडर मिसळताना योग्य प्रमाण राखले जात नाही. किंबहुना त्याचे प्रमाणच माहीत नसल्याने वाट्टेल तशी ब्लिचिंग व पीएसएल पावडर टाकली जाते. त्यामुळेच सांगलीच्या पाण्यात ब्लिचिंंग पावडर, पीएसएल पावडर मिसळूनही जडत्वाचे प्रमाण ३.६० आहे. मिरजेतील पाण्याची तपासणी केली असता, तेथील जडपणा शून्य असल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)
...तरच मिळणार सांगलीला शुद्ध पाणी
मिरजेत ब्लिचिंग व पीएसएल पावडर पाण्यात टाकण्यासाठी शास्त्रशुद्ध यंत्रणा आहे. सांगलीच्या जलशुद्धीकरण केंद्रात त्यासाठी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तसे निर्देशही देण्यात आले आहेत. आता त्यावर कार्यवाही होऊन सांगलीकरांना किमान शुद्ध पाणी मिळेल, अशी आशा आहे.
 

सांगलीच्या पाण्यात जडपणा आढळून आला आहे. त्यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाला ब्लिचिंग व पीएसएल पावडरचे प्रमाण योग्यरित्या राखण्याचे आदेश दिले आहेत. शुद्धीकरण यंत्रणेत किरकोळ दुरुस्ती केली, तर शून्य जडपणा येऊ शकतो. त्यादृष्टीने दुरुस्त्या सुरु आहेत. लवकरच सांगलीकरांना शुद्ध पाणीपुरवठा होईल.
- संतोष पाटील, सभापती, स्थायी समिती.

Web Title: Sangliikar is still very important for the citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.