गुरू-शनिच्या युतीची सांगलीकरांनी घेतली अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:27+5:302020-12-23T04:23:27+5:30
संजयनगर : तब्बल चारशे वर्षांनी गुरू आणि शनि हे दोन ग्रह काहीसे जवळ आले होते. अवकाशातील ही अत्यंत ...
संजयनगर : तब्बल चारशे वर्षांनी गुरू आणि शनि हे दोन ग्रह काहीसे जवळ आले होते. अवकाशातील ही अत्यंत दुर्मिळ घटना सोमवारी
रात्रीच्यावेळी आकाशप्रेमींनी दुर्बिणीने अनुभवली. सांगलीच्या संजयनगर येथील सहारा चौक परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयाच्या छतावर विद्यार्थी आणि खगोलप्रेमींनी यासाठी हजेरी लावली होती.
आकाशगंगेतील हा अत्यंत दुर्मिळ योग शेकडो वर्षांनी आला होता. या घटनेची खगोलप्रेमी मोठ्या आतुरतेने वाट पाहात होते. विशेष म्हणजे दुर्बिणीतून जवळ आलेले गुरू आणि शनि हे दोन्ही ग्रह पाहणे म्हणजे दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. खगोलप्रेमींसाठी हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा असल्याची प्रतिक्रिया खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे व राहुल थोरात यांनी दिली.
यावेळी पापा पाटील, शशिकांत सुतार, अमित ठकार, डॉ. सविता अक्कोळे, आशा धनाले, सुहास ऐरोडकर आदी उपस्थित होते.
फोटो-२२दुपाटे०४
फोटो ओळ : संजयनगर येथे सोमवारी आकाशप्रेमींनी दुर्बिणीच्या माध्यमातून गुरू आणि शनि गृहाच्या युतीची पाहणी केली. छाया : सुरेंद्र दुपटे.