सांगलीकरांना पाणी टंचाईची चिंता नाही, चांदोली धरणात 'इतका' पाणीसाठा शिल्लक
By श्रीनिवास नागे | Published: March 3, 2023 05:30 PM2023-03-03T17:30:08+5:302023-03-03T17:30:43+5:30
आजपर्यंत कधीही या भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई जाणवली नाही.
सांगली : चांदोली धरणात सध्या २६.४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, धरणातून शेतीसाठी १०७० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरण प्रशासनामार्फत योग्य नियोजन केल्याने कितीही उशिरा पाऊस सुरू झाला तरी धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणी टंचाई भासणार नाही, अशी माहिती धरण प्रशासनामार्फत देण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागात ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे मातीचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे हे धरण आहे. दरवर्षी ते १०० टक्के भरते. पाणी साठवण सुरू झाल्यापासून आजपर्यंत कधीही या भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई जाणवली नाही.
सध्या धरणातून नदीपात्रात व कालव्यातून शेतीस १०७० क्युसेक पाणी सोडले जात आहे. धरणात २६.४० टीएमसी पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ७६.७४ आहे. उपयुक्त पाणीसाठा १९.५२ टीएमसी आहे.