बापरे... लॉकडाऊनमध्ये सांगलीकरांनी तर हे केले....तुम्हीही त्यात असणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 04:05 PM2020-04-27T16:05:00+5:302020-04-27T16:08:43+5:30
यावर उपाय शोधताना अनेक सोशल साईटस्नी हाय डेफिनेशन (एचडी) ऐवजी एसडी सेवा द्यायला सुरुवात केली आहे. लोकप्रिय साईट यू ट्यूबने व्हिडीओची गुणवत्ता ७२० पिक्सेलवरुन ४८० पिक्सेलपर्यंत खाली आणली आहे. वेबसीरीज, आॅनलाईन फिल्मस् या सेवा पुरवठादारांनीही एचडीऐवजी एसडी गुणवत्ता द्यायला सुरुवात केली आहे.
संतोष भिसे ।
सांगली : लॉकडाऊनच्या महिन्याभरात सांगलीकरांनी तब्बल ५० हजार जीबी डाटा संपविला आहे. बीएसएनएलसह अन्य तीन मोबाईल कंपन्यांच्या इंटरनेट वापरात लॉकडाऊन काळात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. यात एकट्या बीएसएनएलचाच १५ हजार ३५० जीबी डाटा वापरला गेला आहे. मोबाईलचा वापर प्रचंड वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडियाचा प्रचंड वाढलेला वापर, दैनंदिन कामांसाठी आॅनलाईनचा आधार, मनोरंजनासाठी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर, विविध क्षेत्रांत वर्क फ्रॉम होमसाठी आॅनलाईनचा वापर, विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात आॅनलाईन अभ्यासक्रम यामुळे इंटरनेटचा वापर सध्या गेल्या दशकभरात कधी नव्हे तो प्रचंड वाढला आहे. यामुळे आॅनलाईन ट्रॅफिक जॅमच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून, अनेकदा इंटरनेटची गती मंदावल्याचे अनुभव नेटकºयांना येत आहेत.