इस्लामपूरच्या नाट्यवाचन स्पर्धेत सांगलीची ‘अल्कश’ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:38 AM2020-12-14T04:38:48+5:302020-12-14T04:38:48+5:30
इस्लामपूर : येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेतर्फे घेतलेल्या प्राचार्य शिवाजीराव कुंभार स्मृती नाट्यवाचन स्पर्धेत सांगलीच्या ‘अल्कश’निर्मित ...
इस्लामपूर : येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेतर्फे घेतलेल्या प्राचार्य शिवाजीराव कुंभार स्मृती नाट्यवाचन स्पर्धेत सांगलीच्या ‘अल्कश’निर्मित ‘दोन ध्रुवावर आपण दोघे’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला.
नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कुंभार यांच्या स्मृतिनिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्याहस्ते व प्राचार्यार् डॉ. दीपा देशपांडे, श्रीमती कल्पना कुंभार, नाट्य परिषदेच्या अध्यक्षा वृषाली आफळे, उपाध्यक्ष डॉ. सूरज चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील ८ संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. स्पर्धेमध्ये बालगंधर्व सांस्कृतिक मंच नागठाणे या संस्थेने वाचन केलेल्या ‘दारू’ या एकांकिकेला द्वितीय, तर इस्लामपूरच्या नटरंग ग्रुपने वाचन केलेल्या ‘लागीर’ या एकांकिकेस तृतीय क्रमांक मिळाला. वाचिक अभिनय पुरुषसाठी सांगलीच्या निखिल यांना प्रथम पुरस्कार, तर नागठाणेच्या विठ्ठल यांना द्वितीय क्रमांक मिळाला.
वाचिक अभिनय स्त्रीसाठी प्रथम क्रमांक इस्लामपूरच्या शिंगण यांना, तर द्वितीय क्रमांक सांगलीच्या धनश्री कुलकर्णी यांना मिळाला.
नियामक मंडळ सदस्य प्रा. डॉ. संदीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शशिकांत कुलकर्णी यांनी आभार मानले. रज्जाक मुल्ला, गायत्री खैर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी अलका शहा, प्रा. अरुण कापसे, समीर शिकलगार, राहुल पवार उपस्थित होते.
फोटो- १३१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर
फोटो ओळ :
इस्लामपूर येथील नाट्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सांगलीच्या कलाकारांना प्रा. शामराव पाटील, कल्पना कुंभार यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी प्राचार्या दीपा देशपांडे, वृषाली आफळे, अलका शहा, संदीप पाटील उपस्थित होते.