सांगलीत पंधरा लाखांचा ऐवज लंपास, बंगला फोडला : २६ तोळे दागिन्यासह दीड लाखाच्या रोकडवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:25 PM2018-01-02T18:25:28+5:302018-01-02T18:29:20+5:30

विश्रामबाग येथील खोजा कॉलनीजवळ गजानन कॉलनीत राहणारे चाँदमोहम्मद जानमहोम्मद खान यांचा बंगला फोडून चोरट्यांनी २६ तोळे सोन्याचे दागिने, दोनशे ग्रॅम चांदी, दीड लाखाची रोकड, टीव्ही व दुचाकी असा दहा लाखाचा ऐवज लंपास केला. सोमवारी दुपारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. ​​​​​​​

Sangli's fifteen lacs of lump, bungalow bolted: 26 Tola jewelery worth Rs.1 lakh | सांगलीत पंधरा लाखांचा ऐवज लंपास, बंगला फोडला : २६ तोळे दागिन्यासह दीड लाखाच्या रोकडवर डल्ला

सांगलीत पंधरा लाखांचा ऐवज लंपास, बंगला फोडला : २६ तोळे दागिन्यासह दीड लाखाच्या रोकडवर डल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीत पंधरा लाखांचा ऐवज लंपास, बंगला फोडला २६ तोळे दागिन्यासह दीड लाखाच्या रोकडवर डल्लासीसीटीव्हीची मदत, तपासासाठी दोन पथके बाहेर

सांगली : विश्रामबाग येथील खोजा कॉलनीजवळ गजानन कॉलनीत राहणारे चाँदमोहम्मद जानमहोम्मद खान यांचा बंगला फोडून चोरट्यांनी २६ तोळे सोन्याचे दागिने, दोनशे ग्रॅम चांदी, दीड लाखाची रोकड, टीव्ही व दुचाकी असा दहा लाखाचा ऐवज लंपास केला. सोमवारी दुपारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

चाँदमोहम्मद खान यांचे कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथे प्लॅस्टर आॅफ पॅरीस विक्रीचे दुकान आहे. ३० डिसेंबरला ते कुटूंबासह जवळगाव येथे नातेवाईकांच्या लग्नास गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा उचकटून प्रवेश केला.

दोन बेडरुमधील कपाटे फोडून त्यामधील साहित्य विस्कटले. लॉकरमधील सोन्याच्या पाटल्या, गंठण, मंगळसूत्र, चेन, नेकलेस, बिलवर असे २६ तोळ्याचे दागिने, दोनशे ग्रॅम चांदीचे दागिने व दीड लाखाच्या रोकडवर डल्ला मारला.

हॉलमधील अठरा इंची टीव्ही तसेच गॅलरीत लावलेली दुचाकीही लंपास केली. सोमवारी दुपारी खान कुटूंब जळगावाहून परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खान कुटूंब जळगावला गेले, त्याचदिवशी रात्री चोरी झाल्याचा संशय आहे.

चोरट्यांचा माग काढण्यास श्वान पथकास पाचारण केले होते. श्वान जवाहर हौसिंग सोसायटीपर्यंत गेले. तिथेच ते घुटमळले. ठसे तज्ञांना एक ठसा मिळाला आहे. त्याआधारे पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे.

बंगल्याची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर एक रिकामे मोते सापडले. यामध्ये कटावणी आढळून आली. ही कटावणी चोरट्यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कटावणीने त्यांनी कडी व कोयंडा उचकटला असण्याची शक्यता आहे. त्यावरील ठसे व बंगल्यातील कपाटावर मिळालेल्या ठशांची तपासणी केली जाणार आहे. पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली.

सीसीटीव्हीची मदत

खान यांच्या बंगल्यासमोर एक बंगला आहे. या बंगल्याबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेºयातील शनिवारपासून ते सोमवारी दुपारपर्यंत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फुटेज तपासणी सुरु आहे. महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. तपासासाठी दोन पथके बाहेरील जिल्'ात पाठविण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Web Title: Sangli's fifteen lacs of lump, bungalow bolted: 26 Tola jewelery worth Rs.1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.