सांगलीचे अंतिम मतदान ६५.३८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:51 PM2019-04-24T23:51:20+5:302019-04-24T23:51:26+5:30

सांगली : नवमतदारांचा उत्साह, महिलांचे लक्षणीय मतदान आणि तुल्यबळ उमेदवारांमुळे गतवेळच्या तुलनेत यंदा मतदान दोन टक्क्यांनी वाढले आहे. मतदानाची ...

Sangli's last polling was 65.38 percent | सांगलीचे अंतिम मतदान ६५.३८ टक्के

सांगलीचे अंतिम मतदान ६५.३८ टक्के

Next

सांगली : नवमतदारांचा उत्साह, महिलांचे लक्षणीय मतदान आणि तुल्यबळ उमेदवारांमुळे गतवेळच्या तुलनेत यंदा मतदान दोन टक्क्यांनी वाढले आहे. मतदानाची एकूण टक्केवारी यंदा ६५.३८ इतकी झाली असून, पुरुषांचे मतदान ६७.३३ टक्के, तर महिलांचे ६३.३१ टक्के इतके झाले आहे.
सांगली लोकसभा मतदार संघामध्ये १८ लाख ३ हजार ५४ मतदारांपैकी ११ लाख ७८ हजार ८१४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख २५ हजार ६१४ इतकी असून, महिला मतदारांची संख्या ५ लाख ५३ हजार १८३ इतकी आहे. एकूण मतदान ६५.३८ टक्के इतके झाले.
निवडणूक रिंगणात यंदा १२ उमेदवार उभे होते. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर या प्रमुख उमेदवारांमध्ये जोरदार चुरस दिसून आली. तुल्यबळ उमेदवारांमुळे रंगतदार बनलेल्या निवडणुकीत मतांचा टक्का वाढला. यास प्रशासकीय स्तरावर राबविण्यात आलेल्या अभियानाचाही हातभार आहे. एकूण मतदानात नवमतदारांचा सहभाग मोठा दिसून येतो. महिला मतदारांनीही लक्षणीय मतदान केल्याचे दिसून येत आहे.
गतवेळच्या निवडणुकीची तुलना करता महिलांच्या मतदानात १ टक्का, तर पुरुषांच्या मतदानात २ टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. एकूण मतदानाची तुलना करता गत निवडणुकीत ६३.४७ टक्के मतदान झाले होते. यंदा ६५.३८ टक्के झाले असून १.९१ टक्के वाढ दिसून येत आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघातील महिला व पुरुषांच्या टक्केवारीची तुलना केली तर, जवळपास समान मतदान झाले आहे. अन्य विधानसभा मतदारसंघात स्त्री व पुरुष यांच्या मतदानात मोठा फरक दिसून येतो. सर्वत्र स्त्रियांचे मतदान पुरुषांपेक्षा कमी दिसत आहे.
तृतीयपंथी मतदारांच्या मतदानाची टक्केवारी सर्वात कमी म्हणजेच २३.२९ टक्के इतकी आहे. मतदारसंघात एकूण ७३ मतदार होते. यातील केवळ १७ मतदारांनी हक्क बजावला.
लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदाची टक्केवारी ही पाचव्या क्रमांकाची मोठी टक्केवारी आहे. त्यामुळे यावेळी झालेले मतदान समाधानकारक असल्याचे मानले जात आहे.
आजपर्यंत झालेले मतदान (कंसात उमेदवारांची संख्या)

वर्ष टक्के
४१९५२ : ६०.८९ (४)
४१९५७ : ६५.७८ (२)
४१९६२ : ६६.०३ (४)
४१९६७ : ६७.८१ (४)
४१९७१ : ५८.२१ (६)
४१९७७ : ५७.६० (२)
४१९८० : ६४.०४ (२)
४१९८४ : ६५.०५ (२)
४१९८९ : ५८.६५ (५)
४१९९१ : ५१.८० (८)
४१९९६ : ५८.०४ (१८)
४१९९८ : ५९.४७ (४)
४१९९९ : ६८.४७ (४)
४२००४ : ५८.४१ (६)
४२००९ : ५२.१२ (१४)
४२०१४ : ६३.७१ (१७)
४२0१९ : ६५.३८ (१२)
ठिकाण पुरुष स्त्री एकूण पुरुष पुरुष स्त्री स्त्री एकूण टक्केवारी
टक्केवारी टक्केवारी
मिरज १६६४४३ १५७७१९ ३२४१७८ ११२५८0 ६७.६४ ९६४३६ ६१.१४ २0९0१८ ६४.४८
सांगली १६३२0६ १५७५५१ ३२0७९0 १०७३२२ ६५.७६ ९४८२५ ६0.१९ २0२१५८ ६३.0२
पलूस-कडेगाव १३९0४४ १३६१९८ २७५२४७ ९७३९३ ७0.0४ ८९0१0 ६५.३५ १८६४0४ ६७.७२
खानापूर १६६१२0 १५४९८0 ३२११0७ १0७७५२ ६४.८६ ९९३0६ ६४.0८ २0७0६१ ६४.४८
तासगाव-क.महां १५0५४१ १४१५९७ २९२१४४ १0८४४६ ७२.0४ ९५६११ ६७.५२ २0४0५७ ६९.८५
जत १४३८८२ १२५७00 २६९५८८ ९२१२१ ६४.0३ ७७९९५ ६२.0५ १४२९४९ ६३.१०
एकूण ९२९२३६ ८७३७४५ १८0३0५४ ६२५६१४ ६७.३३ ५५३१८३ ६३.३१ ११७८८१४ ६५.३८

Web Title: Sangli's last polling was 65.38 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.