सांगलीचा मल्ल रामदास पवार विजयी

By admin | Published: May 3, 2017 11:13 AM2017-05-03T11:13:13+5:302017-05-03T11:13:13+5:30

फेकरीत आम दंगल : हिंद केसरी दीनानथ सिंग यांच्या हस्ते आखाडा पूजन

Sangli's Mall Ramdas Pawar won | सांगलीचा मल्ल रामदास पवार विजयी

सांगलीचा मल्ल रामदास पवार विजयी

Next

 भुसावळ, दि.3- तालुका कुस्तीगीर संघातर्फे 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनी मल्ल स्व.सुखदेवराव निकम यांच्या स्मृती प्रित्यर्थ तालुक्यातील फेकरी येथील जि.प.शाळेच्या प्रांगणावर पार पडलेल्या कुस्ती मैदानात मानाच्या गदेचा मानकरी  सांगली येथील प्रसिद्ध मल्ल रामदास पवार हा ठरला. त्याला मान्यवरांच्या हस्ते मानाची गदा व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

पवार याने दिल्लीचा मल्ल सोनूसिंग याचे आव्हान स्वीकारुन तुफानी खेळी करीत पंचानी कुस्तीला वेळ द्या,असे जाहीर करताच रामदास पवार कुस्ती चितपट व्हावी,अशी विनंती केली. दरम्यान मानाचा सामना लांबत असता हिंद केसरी दीनानाथसिंग यांनी पंचाची भूमीका पार पाडत  कुस्ती गुणांच्या आधरावर शून्य एक अशा गुणांनी पवार यांना विजयी घोषीत केले.
प्रसंगी लहानमोठय़ा 80-100 च्या दरम्यान कुस्तींची जोड लावण्यात आली.
प्रारंभी परंपरेनुसार स्व.सुखदेवराव निकम यांच्या निवास स्थानापासून मल्ल व मान्यवर यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
या नंतर 1961 चे पाचवे हिंद केसरी दीनानाथ सिंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आखाडा पूजन करण्यात आले.त्यांच्या सोबत   नामदेव पहेलवान,  शेख पापा शेख कालू, सुधाकर जावळे, सुनील काळे, प्रशांत पाटील, गुरुजितसिंग चाहेल, सभापती सुनील महाजन, माजी उपसभापती गजानन नेमाडे, मुरलीधर पाटील होते.
रेफरी म्हणून बाबा पहेलवान,उत्तम पहेलवान, रमेश निकम पहेलवान, इस्माईल पहेलवान यांनी काम पाहिले.
राजकिरण निकम, कालू शहा, रवी पाटील, ईश्वर लोहार, निशांत निकम, संदीप निकम, अजय तायडे, चिंरामण सोनवणे, सुनील ब:हाटे, युसूफ शहा,   प्रदीप निकम, ज्ञानेश्वर नाफडे, सुलेमान तडवी,नसीर शहा,मनोहर कोळी यांनी परीश्रम घेतले.
 तालुका कुस्तीगीर संघटनेचे सचिव प्रशांत निकम यांनी संपूर्ण स्पर्धेचे धावते वर्णन केले. मिलिंद सुरवाडे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी) 

Web Title: Sangli's Mall Ramdas Pawar won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.