किसान सभेतर्फे सांगलीत दूध वाटप आंदोलन : दूध उत्पादकांची लूट थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:52 AM2018-05-04T00:52:50+5:302018-05-04T00:52:50+5:30
सांगली : दुधाला सरकारने प्रति लिटर २७ रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले. ‘लुटता कशाला, फुकटच प्या’ या आशयाच्या घोेषणा यावेळी
सांगली : दुधाला सरकारने प्रति लिटर २७ रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले. ‘लुटता कशाला, फुकटच प्या’ या आशयाच्या घोेषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व जिल्ह्यातही काही ठिकाणी हे आंदोलन करण्यात आल.
शेतकऱ्यांना लुटण्यापेक्षा फुकटच दूध घ्या, यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ३ मे ते ९ मेअखेर हे आंदोलन होणार असून ठिकठिकाणी दूध वाटप केले जाणार आहे. याची सुरूवात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाने झाली.
आंतरराष्टÑीय दूध पावडरचे दर कोसळल्याचे सांगत, राज्यात दुधाचा महापूर असल्याचे सांगण्यात येत आहे. एक टॅँकर दुधाचे तीन टॅँकर दूध तयार केले जात आहे. चांगल्या दर्जाच्या दुधाला १७ रूपये दर देऊन तेच दूध ५० रूपये लिटरने ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. त्यामुळे शेतकºयांची लूट सरकारकडून सुरू असून ती थांबविण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
यावेळी उमेश देशमुख, सुदर्शन घेरडे, जयकुमार सकळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको
सांंगली : सरकारच्यावतीने कर्जमाफीची घोषणा करताना गाईच्या दुधाला प्रति लिटर २७ रूपये दर देण्याची घोषणा केली होती. त्यावर अभ्यासासाठी समिती नेमण्यात आली. मात्र, अजूनही त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने दुधाची दरवाढ करावी, या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील शिवशंभो चौकात झालेल्या या आंदोलनात मौजे डिग्रज येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदनात म्हटले आहे की, सरकारने दुधाची दरवाढ करून शेतकºयांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अभ्यास समिती नेमूनही त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत स्वत:ला शेतकºयांचे तारणहार समजतात. मात्र, ते मंत्री झाल्यापासून त्यांनीही दूध उत्पादकांना दिलासा दिलेला नाही. सध्या गोळी पेंड, चारा, मिनरल मिक्श्चर, मजुरी यासह इतर खर्च वाढत चालल्याने दूध उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे तातडीने दूध दरवाढ करावी, अन्यथा पुढील काळात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे वाहन अडविण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस सुनील फराटे, समीर पाटील, विजय लांडे, अश्विनकुमार बिरनाळे, सनी आवटी, सुहास गाढवे, महावीर चौगुले, वसंत भिसे आदी सहभागी झाले होते.