सांगलीचे रस्ते गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:08 PM2017-08-27T23:08:09+5:302017-08-27T23:08:12+5:30

Sangli's roads flooded the crowd | सांगलीचे रस्ते गर्दीने फुलले

सांगलीचे रस्ते गर्दीने फुलले

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक विषयांनी सजलेले सांगलीचे बहुतांश देखावे रविवारी खुले झाले. सुटीचा दिवस असल्याने सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी शहरात गर्दी केली होती. अनेक चौकांना जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
यावर्षी अनेक सुंदर व आशयपूर्ण देखावे सांगलीत उभारण्यात आले आहेत. मूर्ती देखाव्यांबरोबरच काही ठिकाणी विविध मंदिरे आणि वास्तूंच्या प्रतिकृतीही उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. उत्सव सुरू झाल्यापासूनचा कालचा पहिलाच रविवार असल्याने सुटीदिवशी नागरिकांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केली होती. शनिवारी उत्सवाच्या दुसºया दिवशी केवळ तीनच मंडळांचे देखावे खुले झाले होते. रविवारी बहुतांश मंडळांनी देखावे खुले केले. त्यामुळे शहरातील कॉलेज कॉर्नर, आमराई, वखारभाग, पटेल चौक, गणपती पेठ, गणपती मंदिर परिसर, कापड पेठ, बालाजी चौक, मारुती रोड, महापालिका ते स्टँड रोड, मारुती चौक ते स्टँड चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत होती. याच मार्गावर अनेक मंडळांनी सुंदर देखावे साकारले आहेत. मंडळांच्या गणेशमूर्तीही अत्यंत देखण्या आहेत. काही मंडळांनी यावर्षी भव्य देखावे साकारताना छोट्या आकारातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
या मार्गावर व प्रमुख चौकात खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे, खेळणी, पाळणे यांचीही गर्दी दिसत आहे. त्यामुळे शहरातील अनेक चौकांना जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यावेळी मंडळांनी सामाजिक संदेश देणारे फलकही झळकविले आहेत. सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली नागरिकांची गर्दी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कायम होती.
शहरात आता पाचव्या दिवसाच्या मिरवणुकीच्या स्वागताचीही तयारी सुरू झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हिंदू एकताची स्वागत कमान टिळक चौकात सज्ज झाली आहे. संघटनेचे प्रमुख विजय कडणे यांनी मिरवणुकीच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले. पाचव्या दिवशी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाºया भाविकांसाठी महापालिकेने ठिकठिकाणी शौचालये व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारण्यास सुरुवात केली आहे.
सांगलीच्या गणपती मंदिराला उत्सवानिमित्त रोषणाईचा साज चढविण्यात आला असून दररोज रात्री याठिकाणी अनेक भाविक मंदिराच्या आकर्षक रोषणाईसह सेल्फी घेण्यास व मंदिराच्या सौंदर्याला कॅमेºयात बंदिस्त करण्यासाठी येत आहेत.
कमानींनी वेधले लक्ष
शहरातील बहुतांश चौकात मोठमोठ्या कमानी उभारून उत्सवात रंग भरण्यात आला आहे. स्टेशन चौकातील नवहिंद मंडळ आणि टिळक चौकातील हिंदू एकताची कमान आकर्षणाचे केंद्र बनली आहे. त्याचबरोबर सुवर्ण मंडळ, शिवमुद्रा मंडळ, महालक्ष्मी मंडळ, पटेल चौक मंडळ यांनीही मोठमोठ्या कमानी उभारल्या आहेत. काही ठिकाणी स्वागत कमानींना आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे.
सेल्फीचे दुष्परिणाम : देखाव्यात स्थान
‘सेल्फी’च्या दुष्परिणामाचा विषय सध्या चर्चेत आला आहे. सेल्फीचे वेड जिवावर बेतल्याच्या अनेक घटना गेल्या वर्षभरात घडल्या. या ज्वलंत विषयाला सांगलीच्या महाराणी झाशी चौक गणेशोत्सव मंडळाने हात घातला आहे. सेल्फीच्या दुष्परिणामांबरोबरच घरातील आई-वडिलांची दिशाभूल करून वाईट गोष्टी अंगिकारणाºया तरुणांवरही भाष्य केले आहे. मूर्ती देखाव्यातून हा सामाजिक देखावा त्यांनी लोकांसमोर उभारला आहे. त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
 

Web Title: Sangli's roads flooded the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.