सांगलीच्या विवाहितेचा गोव्यात छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 AM2021-01-09T04:22:32+5:302021-01-09T04:22:32+5:30
सांगली : गोवा येथील मडगावमध्ये सांगलीच्या विवाहितेचा पैशासाठी छळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. माहेरहून घरबांधणीसाठी दहा लाख आणावेत ...
सांगली : गोवा येथील मडगावमध्ये सांगलीच्या विवाहितेचा पैशासाठी छळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. माहेरहून घरबांधणीसाठी दहा लाख आणावेत यासह चारित्र्याचा संशय घेण्यात आला. मार्च २०१९ ते मार्च २०२० दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी रूकैय्या मोहसीन बेदरेकर (वय २५, सध्या रा. चांदणी चाैक, सांगली) यांनी पतीसह तिघांविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार मोहसीन मुख्तार बेदरेकर, मुमताज मुख्तार बेदरेकर, मुख्तार मोहमद अली बेदरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रूकैय्या यांचा मोहसीन यांच्याशी विवाह झाला आहे. विवाहानंतर ते मडगाव (गोवा) येथे राहण्यास होते. यावेळी संशयित मोहसीनसह इतरांनी रूकैय्या यांना वेळोवेळी शिवीगाळ केली, घर बांधणीसाठी माहेरहून दहा लाख रूपये आणावेत यासाठी शारीरिक, मानसिक छळही केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तिघांविरोधात विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.