दुचाकीची धडक, डोक्याला मार, सांगलीत उद्योजक जागीच ठार
By शीतल पाटील | Published: September 8, 2023 09:08 PM2023-09-08T21:08:34+5:302023-09-08T21:08:42+5:30
सांगली : शहरातील माळी गल्ली येथे दुचाकीच्या धडकेत उद्योजक जागीच ठार झाले. चंद्रकांत विश्वनाथ पाटील (वय ५३, रा. घाडगे ...
सांगली : शहरातील माळी गल्ली येथे दुचाकीच्या धडकेत उद्योजक जागीच ठार झाले. चंद्रकांत विश्वनाथ पाटील (वय ५३, रा. घाडगे हाॅस्पीटलजवळ, सांगली, मुळ गाव पुणदी, ता. पलूस) असे मृतांचे नाव आहे. हा अपघात रात्री नऊच्या सुमारास घडला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
स्मित इंड्रस्टीजच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी उद्योगाची उभारणी केली होती. मिरज एमआयडीसीतील नॅब हाॅस्पीटलचे ते माजी अध्यक्ष व ट्रस्टी होते. तसेच मराठा उद्योजक फौंडेशनचे संचालक म्हणूनही ते काम पहात होते. गुरुवारी सायंकाळी ते कामानिमित्त माळी गल्लीत आले होते. तेथून ते चालतच रस्त्यावर आले. काँग्रेसभवनकडून राममंदिरकडे जाणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.
या धडकेत त्यांच्या डोक्याला मार लागला. डोक्यात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा तातडीने सांगलीच्या सिव्हिल हाॅस्पीटलमध्ये नेण्यात आले. डाॅक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. मराठा समाजाच्यावतीने त्यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली.