सांगलीत आशा वर्कर्स, बांधकाम कामगारांचा मोर्चा, निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:53 PM2019-01-08T13:53:05+5:302019-01-08T13:55:31+5:30
विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा वर्कर्स व बांधकाम कामगारांनी मोर्चा काढला. शासनाविरोधात यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली.
सांगली : विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा वर्कर्स व बांधकाम कामगारांनी मोर्चा काढला. शासनाविरोधात यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली.
देशातील महागाई कमी करा, एक जरी कामगार असला तरी तरी प्रत्येकाला दरमहा 18 हजार रुपये किमान वेतन द्या, सर्व सरकारी योजने मधील अंगणवाडी, आशा, पोषण आहार इत्यादी कामगार ना नियमित कामगार म्हणून दर्जा देऊन त्यांना दरमहा १८ हजार वेतन द्या, सर्व कंत्राटी कामगारना कायम करा, कामगार कायद्यामधील कामगार विरोधी दुरुस्त्या रद्द करा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.
यावेळी शंकर पुजारी म्हणाले, मागील पाच वर्षात देशात कामगार विरोधी धोरण राबविल्या जाणाऱ्या भाजप सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत. यावेळी शंकर पुजारी, पी. एन. काळे, बी. जी. मुलांनी, सु.ग. पेंडुरकर, महेश जोतराव, सदाशिव सूर्यवंशी, दिलीप पाटील, एस. पी. सूर्यवंशी सहभागी होते. सकाळी ११ वाजता विश्रामबाग क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली.