सांगलीत गणरायाचे जल्लोषी स्वागत बाजारपेठांत गर्दी : गणपती बाप्पा मोरयाऽऽऽचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 09:38 PM2018-09-13T21:38:17+5:302018-09-13T21:39:41+5:30

भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ अशा मंगलमयी वातावरणात आणि बाप्पा मोरयाऽऽऽच्या गजरात

 Sangliyat Ganataya's Jolassi welcome rally in the market: Ganapathi Bappa Moraya's alarm | सांगलीत गणरायाचे जल्लोषी स्वागत बाजारपेठांत गर्दी : गणपती बाप्पा मोरयाऽऽऽचा गजर

सांगलीत गणरायाचे जल्लोषी स्वागत बाजारपेठांत गर्दी : गणपती बाप्पा मोरयाऽऽऽचा गजर

Next

सांगली : भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ अशा मंगलमयी वातावरणात आणि बाप्पा मोरयाऽऽऽच्या गजरात गणरायाच्या सांगली नगरीत गुरुवारी बाप्पांचे जल्लोषी आगमन झाले.

लाडक्या देवाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांची गेल्या कित्येक दिवसांपासून स्वागताची तयारी सुरू होती. उत्साही लाटेवर स्वार होत भाविकांनी गुरुवारी गणरायाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. पहाटेपासूनच घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू होती. त्यामुळे सकाळी सातपासूनच बाजार फुलला होता. दिवसभर सांगलीच्या हरभट रस्ता, मारुती रस्ता परिसरात साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. मारुती रस्ता, गावभाग, बसस्थानक परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक याठिकाणी मूर्ती खरेदीसाठी गर्दी होती. सवाद्य मिरवणुकांची दिवसभर रेलचेल दिसत होती.

भगव्या-पांढऱ्या टोप्या, शेला, फेटा परिधान करून पारंपरिक पद्धतीने व वाद्यांच्या गजरात गणरायाच्या स्वागताच्या मिरवणुका रंगल्या होत्या. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदा पारंपरिक ढोल-ताशा, लेझिम, झांजपथक अशा वाद्यांना पसंती दिली. सांगली शहर व परिसरात कार्यकर्त्यांची दिवसभर लगबग सुरू होती. प्रतिष्ठापना झाल्यानंतर देखाव्यांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसांत बहुतांश देखावे खुले होण्याची शक्यता आहे. यंदा पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांबरोबर मंदिरांच्या प्रतिकृती, संगीत-रंगीत कारंजे यांचा प्रभाव अधिक आहे.

संस्थान गणपतीची प्रतिष्ठापना
सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानच्या मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये थाटात करण्यात आली. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मीराजे पटवर्धन यांच्याहस्ते आरती करण्यात आली. यावेळी पौर्णिमा पटवर्धनही उपस्थित होत्या.

Web Title:  Sangliyat Ganataya's Jolassi welcome rally in the market: Ganapathi Bappa Moraya's alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.