सांगलीत गुरुजींचा यंदाही गोधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:58 PM2017-08-20T23:58:21+5:302017-08-20T23:58:24+5:30

Sangliyat Guruji is still in the middle of this year | सांगलीत गुरुजींचा यंदाही गोधळ

सांगलीत गुरुजींचा यंदाही गोधळ

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेतील गुरूजींचा गोंधळ यंदाही कायम राहिला. सत्ताधारी शिक्षक समिती व विरोधकांच्या गोंधळातच रविवारी अवघ्या वीस मिनिटात सभेची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. मंजूर, नामंजूर, धिक्काराच्या घोषणा, ध्वनिक्षेपकासाठी ओढाओढ, व्यासपीठाकडे धावणारे विरोधक, पोलिसांशी बाचाबाची अशा वातावरणात जागा खरेदी, लाभांश वाटपसह सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. दरम्यान, सभेनंतर विरोधकांनी समांतर सभा घेऊन सत्ताधाºयांचा निषेध केला.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सभा येथील दीनानाथ नाट्यगृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शिवाजी पवार होते. सभेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. संचालक हरिभाऊ गावडे यांनी स्वागत केले. त्यानंतर अध्यक्षांनी विषयपत्राचे वाचन सुरू करताच गोंधळाला सुरुवात झाली. विरोधी थोरात गटाचे पोपटराव सूर्यवंशी, हंबीरराव पवार, मुश्ताक पटेल यांच्यासह सभासदांनी व्यासपीठाकडे धाव घेतली; पण पोलिसांनी त्यांना व्यासपीठासमोरच अडविले. तेथून विरोधकांनी धिक्कार, नामंजूरच्या घोषणा सुरू केल्या.
विषयपत्रावरील विषयांना विरोधकांकडून नामंजूरच्या घोषणा देत असतानाच, सत्ताधारी गटाकडून मात्र टाळ्यांच्या कडकडाटात विषय मंजूर करण्यात येत होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले यांनी इतिवृत्त वाचनही गोंधळात केले. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेऊन विषयांना विरोध कायम ठेवला. शि. द. पाटील गटाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, विकास शिंदे यांनी सभागृहातच सत्ताधाºयांविरोधात फलक फडकवित निषेधाच्या घोषणा दिल्या. थोरात व शि. द. गट आक्रमक होताच सत्ताधारी शिक्षक समितीच्या सभासदांनीही व्यासपीठाकडे धाव घेतली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणाव होता; पण पोलिसांनी कुणालाच व्यासपीठाकडे सोडले नाही. सत्ताधाºयांनी ध्वनिक्षेपकाची सोय न केल्याने विरोधक संतप्त झाले होते. विरोधकांनी सभागृहातच पत्रके भिरकावली. सभागृहात गोंधळ उडाला असतानाच, अध्यक्ष शिवाजी पवार यांनी सर्व विषयांना बहुमताने मंजुरी घेतली. तसेच सभासदांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. अध्यक्षांकडून वारंवार शांततेचे आवाहन केले जात होते; पण त्यांच्या आवाहनाला विरोधकांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. प्रचंड गदारोळातच सभेचे कामकाज वीस मिनिटांत संपविले.
त्यानंतर विरोधकांनी सभागृहाबाहेर समांतर सभा घेतली. बँकेचे संचालक व थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव यांनी सत्ताधाºयांचा निषेध केला.
अस्तित्वासाठी गोंधळ : किरण गायकवाड
बँकेची सभा नियमानुसार झाली. सभेच्या पटलावरील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. सत्ताधाºयांनी सभासदांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. व्याजाच्या दरातही कपात केली आहे. त्यामुळे सभासद बँकेच्या कारभारावर समाधानी होता. पण काही मोजकेच लोक स्वत:च्या संघटनेचे अस्तित्व टिकविण्यासाठी सभेत गोंधळ घालत होते. विरोधकांच्या पार्लमेंटरी बोर्डाचा अध्यक्षच व्यासपीठावर जातो. पुढील वीस वर्षे बँकेत सत्तेत येणार नसल्याची जाणीव झाल्याने विरोधकांनी गोंधळ घातल्याचा टोला शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड यांनी लगाविला.
तक्रार करणार : विनायक शिंदे
सभेच्या पूर्वसंध्येला संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष शिवाजी पवार यांनी जागा खरेदीसह अनेक विषय स्थगित करण्यांचे मान्य केले होते; पण प्रत्यक्ष सभेत गोंधळात हे विषय मंजूर केले आहेत. बँकेच्या सभासदांचा या विषयांना विरोध आहे; पण त्याची दखल सत्ताधाºयांनी घेतलेली नाही. जागा खरेदीतून कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्याचा सत्ताधाºयांचा डाव आहे. त्यामुळे त्यांनी सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करणार असून, जागा खरेदीसह काही विषय हाणून पाडू, असा इशारा विनायक शिंदे व अविनाश गुरव यांनी दिला.
बँकेचा नफा बोगस : विकास शिंदे
सत्ताधाºयांनी कर्जरोखे विक्री करून १ कोटी ६७ लाख रुपयांचा नफा झाल्याचा खोटा अहवाल छापला आहे. या बोगस नफ्याची पोलखोल होऊ नये, यासाठी सभा गुंडाळण्यात आली. शिक्षक नसलेले गुंड व पोलिसांच्या बळावर सत्ताधाºयांनी सभासदांचा आवाज दाबला आहे. बँक तोट्यात असताना मालमत्ता खरेदीचा ठराव केला. या बोगस कारभाराविरोधात याविरोधात आम्ही जिल्हाभर आंदोलन छेडणार असल्याचे शि. द. पाटील गटाच्या तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Sangliyat Guruji is still in the middle of this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.