सांगली : आटपाडी पंचायत समितीच्या धनादेशावर बोगस सह्या; कारकुनास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 07:16 PM2018-02-14T19:16:40+5:302018-02-14T19:19:04+5:30

आटपाडी पंचायत समितीच्या धनादेशावर खोट्या सह्या करून १ लाख ८८ हजार ४४१ रुपयांचा अपहार करणाऱ्या भालचंद्र अशोक कदम (वय ३०, रा. खणभाग, सांगली) याला आटपाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

Sangoli: bogus signature on checkpoints of Atpadi Panchayat Samiti; Stuck in the clerk | सांगली : आटपाडी पंचायत समितीच्या धनादेशावर बोगस सह्या; कारकुनास अटक

सांगली : आटपाडी पंचायत समितीच्या धनादेशावर बोगस सह्या; कारकुनास अटक

googlenewsNext
ठळक मुद्देपंचायत समितीच्या धनादेशावर खोट्या सह्या आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

आटपाडी : पंचायत समितीच्या धनादेशावर खोट्या सह्या करून १ लाख ८८ हजार ४४१ रुपयांचा अपहार करणाऱ्या भालचंद्र अशोक कदम (वय ३०, रा. खणभाग, सांगली) याला आटपाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

त्याला न्यायालयासमोर उभे गेले असता दि. १६ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. भालचंद्र कदम या कारकुनाने येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्या धनादेशावर सह्या करून इंडियन उमन को-आॅपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी, सांगली या पतसंस्थेच्या खात्यावर रक्कम जमा केली.

याप्रकरणी माडगूळकर यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर देढे करीत आहेत.

Web Title: Sangoli: bogus signature on checkpoints of Atpadi Panchayat Samiti; Stuck in the clerk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.