वांगीत उपसरपंचपदी संजय कदम बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:25 AM2021-03-21T04:25:05+5:302021-03-21T04:25:05+5:30
लोकमत न्युज नेटवर्क वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संजय यशंवत कदम याची बिनविरोध निवड करण्यात आली ...
लोकमत न्युज नेटवर्क
वांगी :
वांगी (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संजय यशंवत कदम याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत गुलालाची उधळण केली.
वांगी ग्रामपंचायतीच्या मागील झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेसने १७ पैकी १५ जागेवर विजय मिळवला होता. उपसरपंच विद्या पाटणकर यांनी ठरलेली मुदत संपल्याने उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता.
त्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त होती. उपसरपंच निवडीसाठी सरपंच डॉ. विजय होमाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्याची बैठक घेण्यात आली. यामध्ये संजय कदम यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
संजय कदम म्हणाले की ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बिनविरोध उपसरपंच केले. त्यांच्या विश्वासास पात्र राहून येणाऱ्या काळात शासनाच्या योजना गावात प्रभावीपणे राबवून गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न आहे.
यावेळी सुरेश मोहिते, बाबासाहेब सूर्यंवशी, राहुल साळुंखे, धनाजी सूर्यवंशी, भगवान वाघमोडे, राजेंद्र पाटील, मिलिंद सांळुखे, दतात्रय चव्हाण, महादेव दाईंगडे, नीलेश गुरव,
रमेश एडके, गोरख कांबळे, शोभाताई मोहिते, नयना शिदे, विकास एडके आदी उपस्थित होते.