पाणी, विजेचा प्रश्न निकाली काढू : संजय पाटील

By admin | Published: January 6, 2015 12:16 AM2015-01-06T00:16:02+5:302015-01-06T00:57:40+5:30

ते म्हणाले की, दुष्काळी तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न, वीज, बेरोजगारी आदी प्रश्नही महत्त्वाचे आहेत.

Sanjay Patil should remove water, electricity issue: | पाणी, विजेचा प्रश्न निकाली काढू : संजय पाटील

पाणी, विजेचा प्रश्न निकाली काढू : संजय पाटील

Next

कवठेमहांकाळ : जिल्ह्यातील जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ करुन दाखवू तसेच पाणी, वीज, बेरोजगार आदी प्रश्न निकालात काढण्यासाठी आपण सर्व ताकद पणाला लावू, अशी ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
खासदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कवठेमहांकाळ येथे जतचे आमदार विलासराव जगताप आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, दुष्काळी तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न, वीज, बेरोजगारी आदी प्रश्नही महत्त्वाचे आहेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत तसेच अजितराव घोरपडे यांनी शेतीच्या पाण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यात या महिन्यात जलसंपदामंत्री गिरीश बापट यांना बोलाविण्यात येणार आहे.
आमदार जगताप म्हणाले की, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या दुष्काळी तालुक्यांनी संजयकाका यांना मोठे मताधिक्य दिले आहे. त्यामुळे या भागाचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत.
घोरपडे म्हणाले की, खा. पाटील यांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संपूर्ण ताकद लावावी, आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम आहोत.
यावेळी संजीव सावंत, मिलिंद कोरे, अनिल लोंढे, दयानंद सगरे, तानाजी यमगर, सुनील पाटील, अवधूत पवार, ओंकार पाटील, उदयराजे भोसले, डॉ. शिवपुत्र कोरे उपस्थित होते.
सावळज : खा. संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तासगाव तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तासगावात खा. पाटील यांनी शुभेच्छा स्वीकारून विविध उपक्रमांचे उद्घाटन केले.
सहाय्यक विभागीय आयुक्त इंद्रजित देशमुख, तहसीलदार राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी हेमंत निकम, अनिकेत भारती, रमेश बनकर, मनोज देसाई, महादेवराव हिंगमिरे, सतीश नलवडे, शिवाजीराव पाटील, अविनाश पाटील, अमित पाटील, दिलीप देसाई, निलेश दीक्षित, प्रकाश माळी, प्रशांत पाटील, अभिजित शिरोटे, गुणवंत पाटील, बाहुबली शिरोटे, अमोल काटकर, जयवंत माळी, संजय साळुंखे, सुनील जाधव, तानाजी लांडगे, प्रदीप माने, हणमंत पाटील, रामदास खताळ, विनायक पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)

Web Title: Sanjay Patil should remove water, electricity issue:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.