संजयकाकांनी केले सदाभाऊंचे सारथ्य-सांगलीत राजकीय चर्चा रंगली : कृषी राज्यमंत्र्यांच्या चेहºयावर हसू फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:48 AM2017-11-26T01:48:39+5:302017-11-26T01:51:12+5:30
सांगली : हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमानिमित्त शनिवारी वाळवा येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सारथ्य खासदार संजयकाका पाटील यांनी केले. एक खासदार दुरावले असले तरी,
सांगली : हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमानिमित्त शनिवारी वाळवा येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सारथ्य खासदार संजयकाका पाटील यांनी केले. एक खासदार दुरावले असले तरी, जिल्ह्याचेच दुसरे खासदार मित्रत्वाच्या कक्षेत आल्याने सदाभाऊंना थोडा दिलासा मिळाला असेल, अशी चर्चाही उपस्थितांत रंगली होती.
हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमासाठी शनिवारी नागरिक, निमंत्रित राजकारणी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील लोकांची गर्दी झाली होती. वाहनांचीही दाटी झाली होती. इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटनास आल्यानंतर त्याचठिकाणी सदाभाऊ खोत यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते वाहनातून खाली उतरलेच नाहीत. उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून संजयकाका पाटील तेथे आले. त्यांचे वाहन पुढे लावले होते म्हणून त्यांनी सदाभाऊंच्या वाहनात बसणे पसंत केले.
छायाचित्रकारांना मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यास वाहन नसल्याने संजयकाकांनी त्यांनाही सदाभाऊंच्या वाहनात बसण्याची सूचना केली आणि स्वत: वाहनाचे सारथ्य केले. वाहनात गर्दी झाल्याने सदाभाऊ आणि संजयकाका यांच्यामध्ये गिअरच्या बाजूलाच वाहनचालकाला बसावे लागले.कसरत करत संजयकाकांनी सारथ्य केले. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मोटार आल्यानंतर सदाभाऊंचे सारथ्य संजयकाकांनी केल्याचे पाहून उपस्थित अनेकांना आश्चर्य वाटले. संजयकाकांनी सदाभाऊंना विश्रांती घेण्याचाही सल्ला दिला. त्यानंतर दोघेही सभास्थानी विराजमान झाले.
वाळवा येथे शनिवारी हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमासाठी आलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सारथ्य खासदार संजयकाका पाटील यांनी केले. त्यांनी वाहन चालू करताच सदाभाऊंच्या चेहºयावर हसू फुलले. उपस्थित राजकीय नेत्यांमध्ये हा चर्चेचा विषय बनला होता.