संजयकाका पाटील यांची दिघंची आराेग्य केंद्रास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:44+5:302021-05-06T04:26:44+5:30
दिघंची : खासदार संजयकाका पाटील यांनी दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १४ गावांचा आढावा घेतला. ...
दिघंची : खासदार संजयकाका पाटील यांनी दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १४ गावांचा आढावा घेतला. यावेळी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, युवा नेते अनिल पाटील, प्रणव गुरव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. लांबून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दिघंचीत वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिघंचीची लोकसंख्या जास्त असल्याने व दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत १४ गावे येत असल्याने या ठिकाणी लसीचा तुटवडा आहे. यामुळे येथे लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे औषधांची कमतरता जाणवू नये यासाठी फॅबी फ्लूच्या गोळ्या लवकरात लवकर उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहनकाका रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंदे, अजित मोरे, बंडू मोरे, दीपक शिंदे, अमोल सावंत यांच्यासह प्राथमिक आरोग्य विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
काेट
दिघंचीत कोरोनाबधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना आर्थिक झळ पाेहाेचू नये, यासाठी दिघंचीत २५ बेडचे शासकीय कोविड रुग्णालय सुरू करावे, अशी आग्रही मागणी युवा मोर्चा व ग्रामपंचायतीतर्फे खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे केली आहे.
- प्रणव गुरव
तालुकाध्यक्ष भाजप युवा मोर्चा
फोटो : ०५ दिघंची १
ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास खासदार संजयकाका पाटील यांनी भेट दिली.