संजयनगर पोलीस ठाण्यात भरली शाळा

By admin | Published: October 11, 2015 12:10 AM2015-10-11T00:10:42+5:302015-10-11T00:13:39+5:30

कामकाजाची माहिती : पोलिसांचा उपक्रम; विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

Sanjaynagar Police Station filled the school | संजयनगर पोलीस ठाण्यात भरली शाळा

संजयनगर पोलीस ठाण्यात भरली शाळा

Next

सांगली/संजयनगर : येथील संजयनगर पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी शाळा भरविण्यात आली. पोलिसांचे काम, पोलिसांकडे असलेली हत्यारे, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी हा उपक्रम राबविला. त्यास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची असते. सामान्य नागरिकाला पोलीस ठाण्यात येण्यास भीती वाटू नये, शाळकरी मुले मोठी झाल्यानंतर निर्भयपणे त्यांनी पोलीस ठाण्यात यावे, ही अपेक्षा आहे. त्यांच्याव्यतिरिक्त पोलिसांच्या कामाचे स्वरूप मुलांना सर्वसाधारणपणे समजून यावे. पिस्तुल भरपूर वजनाचे असते. रायफल दिसताना चांगली दिसते, ती चालविण्यासाठी पोलिसांना कष्ट उचलावे लागतात, याचीही माहिती मुलांना मिळावी, यासाठी शनिवारी शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सुनील फुलारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना एस. एल. आर. पिस्तुल, एनएमएन कारवाईला ३००३ रायफल, हेल्मेट, लाठी लॉकअप याबाबतची माहिती शांतिनिकेतन माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिली. यामध्ये शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक नारायण एकसिंगे, हवालदार संजय जाधव, सुरेश सूर्यवंशी, संजय कांबळे, मंगेश गुरव, एस. ई. चव्हाण, फौयाज बारगीर, राजेंद्र साखळकर, संजय खाडेकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
 

Web Title: Sanjaynagar Police Station filled the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.