संजीव माने यांना दिल्लीत डॉक्टरेट प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:03 AM2020-12-05T05:03:50+5:302020-12-05T05:03:50+5:30
आष्टा : येथील कृषिभूषण संजीव गणपतराव माने यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्यावतीने डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे झालेल्या ...
आष्टा : येथील कृषिभूषण संजीव गणपतराव माने यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्यावतीने डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. दिपुरंजन सिन्हा व डीन प्रियादर्शी नायक यांच्याहस्ते पदवी देऊन गौरविण्यात आले.
संजीव माने यांना राज्य शासनाने कृषिभूषण व शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीवेळी ऊस शेतीतील विविध प्रयोगाविषयी संजीव माने यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या कामाचे कौतुक केले. उसाचे एकरी १०० टन उत्पादन घेण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम यशस्वी प्रयोग करून असंख्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. हजारो शेतकऱ्यांच्या उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक यासह देशातील विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. माने यांनी एकरी १६८ टन उत्पादन घेऊन जागतिक विक्रम केला आहे. सध्या उसाचे एकरी २०० टन उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
फोटो : ०२१२२०२०-आयएसएलएम- आष्टा न्यूज
फोटो ओळ : कृषिभूषण संजीव माने यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीतर्फे दिल्ली येथील कार्यक्रमात डॉ. दिपुरंजन सिन्हा व डीन डॉ. प्रियदर्शी नायक यांच्याहस्ते मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.