इस्लामपूरचा संकेत गरुड केंद्रीय वनसेवा परीक्षेत देशात २३ वा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 01:16 PM2022-06-29T13:16:38+5:302022-06-29T13:17:09+5:30

संकेतने मुंबई येथे पेट्रोलियम कंपनीत चार वर्षे नोकरी केली आहे.

Sanket garud of Islampur 23rd in the country in Central Forest Service Examination | इस्लामपूरचा संकेत गरुड केंद्रीय वनसेवा परीक्षेत देशात २३ वा

इस्लामपूरचा संकेत गरुड केंद्रीय वनसेवा परीक्षेत देशात २३ वा

googlenewsNext

इस्लामपूर : येथील महादेवनगर परिसरातील संकेत सुनील गरुड याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने वन विभागासाठी घेतलेल्या परीक्षेत देशात २३ वा क्रमांक पटकाविला आहे. संकेत हा आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुमित गरुड यांचा भाऊ आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने वन विभागासाठी ही परीक्षा घेतली होती. गेल्या वर्षी याच शहरातील मीनल सावंत यांनी देशात २६ वा क्रमांक पटकाविला होता. त्यापाठोपाठ संकेत गरुड यांनी हे यश मिळवीत शहराची मान उंचावली आहे.

संकेत गरुड याने इस्लामपूर शहरातच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदवी मिळविली आहे. त्यानंतर मुंबई येथे पेट्रोलियम कंपनीत चार वर्षे नोकरी केली आहे. जलसंपदा विभागातील निवृत्त उच्च पदस्थ अधिकारी सुनील गरुड यांचे संकेत हे सुपुत्र आहेत.

Web Title: Sanket garud of Islampur 23rd in the country in Central Forest Service Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.