साडेचार वर्षांच्या साराकडून खाऊचे पैसे पूरग्रस्तांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:54 AM2019-08-16T11:54:57+5:302019-08-16T12:02:38+5:30
सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पूरबाधितांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. सारा सचिन दोरकर या अल्फान्सो हायस्कूल, मिरज मधील साडेचार वर्षांच्या मुलीने खाऊसाठी जमा केलेले पैसे आज पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.
सांगली : जिल्ह्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पूरबाधितांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. सारा सचिन दोरकर या अल्फान्सो हायस्कूल, मिरज मधील साडेचार वर्षांच्या मुलीने खाऊसाठी जमा केलेले पैसे आज पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी अशीच माणुसकी सर्वांनी जपावी आणि पूरग्रस्तांना सढळहस्ते मदतीसाठी पुढे यावे. जिल्ह्यातील 34 गावे विविध संस्था, उद्योजक यांनी दत्तक घेतली आहेत.
अजूनही 70 गावे बाकी आहेत. या 70 गावांसाठीही राज्यातील अनेक संस्था, कार्पोरेट कंपन्या, उद्योजक यांनी पुढे यावे व या गावांच्या पुनर्बांधणीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.