पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सरपंच परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:28 AM2021-03-23T04:28:01+5:302021-03-23T04:28:01+5:30
सांगली : पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार, आमदारांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार, दि. २३ रोजी सरपंच परिषद ...
सांगली : पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार, आमदारांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार, दि. २३ रोजी सरपंच परिषद आयोजित केली आहे. याच कार्यक्रमात आरोग्य केंद्रांना १४ रुग्णवाहिकांचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
प्राजक्ता कोरे म्हणाल्या, कोरोनातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यात १४ नवीन रुग्णवाहिका देण्याचे नियोजन केले आहे. पूर्वीच्या १४ रुग्णवाहिका जादा रनिंग झाल्याने खराब झाल्या आहेत. त्याठिकाणी नवीन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चौदाव्या वित्त आयोगातून बीएस ६ मानांकनाच्या टाइप बी पेेशंट ट्रान्स्पोर्ट रुग्णवाहिका खरेदी करण्याचे आदेश जीएम पोर्टलवरून दिले होते. यासाठी दोन कोटी ८० लाख रुपये खर्च केले आहेत. यांचे लोकार्पण आहे, तसेच जिल्ह्यातील सरपंचांची परिषदही आयोजित केली आहे. सरपंचांना कोरोनाबाबतची जागृती व मॉडेल स्कूल अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सांगली-माधवनगर रोडवरील डेक्कन हॉलमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार संजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रित केले आहे.