सातारा पोलिसांचा पोहोचला राजधानी दिल्लीपर्यंत डंका!
By admin | Published: May 23, 2017 11:27 PM2017-05-23T23:27:11+5:302017-05-23T23:27:11+5:30
सातारा पोलिसांचा पोहोचला राजधानी दिल्लीपर्यंत डंका!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा/शिरवळ : आॅनलाईन प्रक्रियेद्वारे दमदार कामगिरी करण्यात सातारा जिल्हा पोलिस दलाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यश मिळविले आहे. याची कीर्ती दिल्लीपर्यंत पोहोचली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे खंडाळा पोलिस ठाण्याशी संवाद साधू शकतात.
क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीममध्ये पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पोलिस दलाने लक्षणीय कामगिरी केली असून, याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधू शकतात, हे जाणून घेऊन खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्यासह इतर कर्मचारी सतर्क झाले आहेत.
‘आॅनलाईन’मध्ये सज्ज...
गेल्या एक वर्षापासून सातारा जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांनी आॅनलाईन तपास प्रक्रियेवर अधिकाधिक भर दिला आहे. तक्रार दिल्यापासून निकाल लागेपर्यंत प्रत्येक घडामोडीची माहिती आॅनलाईनद्वारे संबंधितांना मिळणार आहे.