कर्जासाठी फसवणूक करणाऱ्या सातारच्या भामट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:30 AM2021-01-16T04:30:02+5:302021-01-16T04:30:02+5:30
रमेश निकम याने मिरजेतील सचिन नायकू बरगाले (वय २७, रा. बोलवाड रस्ता, मिरज) यांना डिसेंबर महिन्यात वेगवेगळ्या ...
रमेश निकम याने मिरजेतील सचिन नायकू बरगाले (वय २७, रा. बोलवाड रस्ता, मिरज) यांना डिसेंबर महिन्यात वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करून आमच्या ‘लेंडिग मार्क’ नावाच्या कंपनीमार्फत तुम्हाला व्यवसायासाठी १४ लाखांचे कर्ज देतो, असे सांगितले. कर्ज देण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या व्यवस्थापकास कमिशन द्यावे लागेल, असे सांगितले.
कर्ज घेण्यासाठी निकम याने बरगाले यांच्याकडून वेळोवेळी एक लाख आठ हजार ८८० रुपये बँक खात्यावर भरावयास लावले. मात्र, त्यानंतर कर्ज न देता फोन बंद केला. कर्जाच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर बरगाले यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. उपअधीक्षक अशोक विरकर, निरीक्षक राजू ताशिलदार, सहायक निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सायबर सेलच्या मदतीने निकम याच्या मोबाईल नंबरचे लोकेशन शोधून काढले. त्याला सातारा जिल्ह्यातील मार्डी येथून अटक करण्यात आली. निकम याने बरगाले यांच्याकडून बॅंक खात्यावर आलेली रक्कम एटीएममधून काढून घेतली होती. ही एक लाख आठ हजार रुपयांची सर्व रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. आरोपी निकम यास अटक करून त्यास वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्यानंतर कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
फोटो-१४रमेश निकम