मिरजेत सत्तावन्न हजाराचा गुटखा पोलिसांनी पकडला दोघांना अटक : कर्नाटकातून वाहतूक
By admin | Published: May 15, 2014 11:49 PM2014-05-15T23:49:24+5:302014-05-15T23:50:20+5:30
मिरज : पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या पथकाने कर्नाटकातून बेकायदा गुटखा वाहतूक करणारी मारुती व्हॅन पकडून ५७ हजारांचा अवैध गुटखा जप्त केला.
मिरज : पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या पथकाने कर्नाटकातून बेकायदा गुटखा वाहतूक करणारी मारुती व्हॅन पकडून ५७ हजारांचा अवैध गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकातील कागवाड येथून गुटख्याची आयात सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी पोलीस हवालदार एम. एच. शेख, प्रशांत कोळी, संदीप नाईक, सागर आंबेवाडीकर, बसवेश्वर शिरगुप्पी यांच्या पथकाने म्हैसाळ रस्त्यावर एमएच १० बीएम ११२६ या मारुती व्हॅनची तपासणी केली. मारुती व्हॅनमध्ये कर्नाटकातून आणलेला ५७ हजार किमतीचा ११ पोती स्टार, कोल्हापुरी, सिंघम गुटखा, सुगंधी सुपारी व मारुती व्हॅन असा २ लाख ८१ हजारांचा ऐवज हस्तगत केला. याप्रकरणी विनायक सदाशिव बुटाले (वय ५०), मारुतीचा चालक राजेंद्र श्रीधर हाबळे (२९, रा. कवठेपिरान) यांना अटक करण्यात आली आहे. विनायक बुटाले यांचे कवठेपिरानमध्ये किराणा दुकान आहे. दुकानात विक्रीसाठी गुटखा नेत असल्याची कबुली त्यांनी दिली. अवैध गुटखाप्रकरणी बुटाले व हाबळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली, मिरजेत गुटखा मोठ्या प्रमाणात सापडत आहे. या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)