शिक्षक संघातर्फे शनिवारी धरणे आंदोलन; विनायक शिंदे : जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 09:32 PM2018-02-02T21:32:17+5:302018-02-02T21:32:40+5:30
सांगली : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह राज्यातील सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शनिवारी,
सांगली : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह राज्यातील सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली. सांगलीत दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले की, राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी शासकीय सेवेत असणाºया शिक्षकांसह कर्मचाºयांना १९८२ च्या तरतुदीनुसार जुनी पेन्शन व भविष्य निर्वाह निधीची योजना सुरु आहे. या शिक्षक व कर्मचाºयांना नवीन परिभाषित अंशदान योजना सुरु करून शासनाने या कर्मचाºयांवर अन्याय केला आहे. या अन्यायाच्या विरोधात राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन व राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही, शासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. उलट नवनवीन शैक्षणिक प्रश्न निर्माण करत आहे.
याबाबत शिक्षक संघाच्यावतीने अनेकवेळा आंदोलन तसेच मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकाजाताई मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेले आहे. परंतु आजपर्यंत खोटी आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे.
यासाठी शनिवारी, ३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संघाच्यावतीने शिक्षक नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी हंबीरराव पवार, अविनाश गुरव, राजकुमार पाटील, फत्तेसिंग पाटील, पोपट सूर्यवंशी, अरुण पाटील तानाजी खोत, धनंजय नरुले, तुकाराम कांबळे, महादेव पवार, प्रभाकर भोसले, गोरख मोहिते, श्रीकांत पवार, महादेव हेगडे, सुधाकर पाटील, सर्व तालुका अध्यक्ष, बँकेचे संचालक व जिल्'ातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.