सातारची ठिणगी... आंदोलनाची नव्हे दरोड्याची

By admin | Published: June 1, 2017 11:29 PM2017-06-01T23:29:14+5:302017-06-01T23:29:14+5:30

सातारची ठिणगी... आंदोलनाची नव्हे दरोड्याची

Saturn's spark ... not the agitation of the dacoity | सातारची ठिणगी... आंदोलनाची नव्हे दरोड्याची

सातारची ठिणगी... आंदोलनाची नव्हे दरोड्याची

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप सुरू होण्यापूर्वीच बुधवारी रात्री साताऱ्यात आंदोलनाची ठिणगी पेटल्याचा गवगवा सोशल मीडियावर झाला... शेतकरी आंदोलकांनी दुधाचा टँकर फोडल्याचे छायाचित्रही प्रत्येकाच्या मोबाईलवर झळकले. मात्र, हे आंदोलक नसून अज्ञात दरोडेखोर असल्याचा शोध गुरूवारी सकाळी सातारा पोलिसांना लागला.
याबाबतची अधिक माहिती अशी की पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दरम्यान एका दूध टँकरवर बुधवार, दि. ३१ रोजी रात्री नऊच्या सुमारास दगडफेक झाली होती. बळीराजा गुरुवारपासून संपावर गेला आहे. यातूनच दगडफेक झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर पसरत होती. मात्र, दगडफेक झालेला तो प्रकार दरोड्यातील असल्याचे निष्पन्न
झाले.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहराजवळील वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दरम्यान सातारा येथे दोघांनी एक दूध टँकर अडवून त्यावर दगडफेक केली. त्यानंतर टँकर चालकाला दारू पिण्याकरिता पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिला असता जबरदस्तीने दारू दुकानापर्यंत ओढत नेऊन चालकाच्या खिशातील तेराशे रुपये जबरदस्तीने काढून मारहाण केली.
तसेच टँकरच्या काचा फोडून नुकसान केले आहे. याबाबत दोघांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Saturn's spark ... not the agitation of the dacoity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.